💥परभणी रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेळणार गोट्या....!


💥महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला या अनोख्या आंदोलनाचा इशारा💥


परभणी (दि.१७ फेब्रुवारी) - परभणी रेल्वे स्टेशनवरील नवीन पादचारी पुलाचे काम पूर्ण होऊन वर्ष उलटून गेले तरीही रेल्वे प्रवासी वर्गासाठी सदरील पादचारी पुल मोकळा झालेला नाही.या संदर्भात दि.२३ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रेल्वे प्रशासनाला निवेदन देखील दिले असून या निवेदनात येत्या आठ दिवसात नवीन पादचारी पूल वापरण्याकरीता मोकळा करवा प्रवाशांना थेट स्टेशनच्या बाहेर येण्यासाठीची ही वाट सुकर करावी अशी मागणी निवेदनात केली . 

रेल्वे प्रशासनाने आज पर्यंत ह्यात काहीच सुधारणा केलेले आढळून आले नाही व पत्र व्यवहार करून अश्वसित सुद्धा केले नाही म्हणून मनसेचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र सैनिक नवीन पादचारी पूल चालू व्हावा ह्यासाठी त्या "पुला' वर २१ फ्रेबूवारी २०२३ रोजी गोट्या खेळणार आहेत नवीन पादचारी पूल तयार होऊन वर्षे लोटले तरीही त्याचा वापर प्रवाशांना करता येत नाही म्हणून त्या पुलाचा सदुपयोग व्हावा म्हणून गोट्या खेळण्यासाठी पुलाचा उपयोग महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आहे.असे निवेदन मनसेने दि.१६ फेब्रुवारी २०२३ रोजी रेल्वे प्रशासनाला दिले आहे.

त्यावेळी श्रीनिवास लाहोटी, अर्जुन टाक, शुभम मुंदडा, अंकुश शेटे,मनविसे शहराध्यक्ष, श्रीकांत पाटील मनविसे शहर उपाध्यक्ष, सूर्यकांत मोगल आदी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या