💥पुर्णा नगर परिषदेचे सेवानिवृत्त ग्रंथपाल डिगांबरआप्पा एकलारे यांचे दु:खत निधन....!


💥त्यांच्या पश्चात दोन मुल व दोन मुली नातवंड असा मोठा परिवार💥

पुर्णा (दि.०४ फेब्रुवारी) - पुर्णा नगर परिषदेचे सेवानिवृत्त ग्रंथपाल ज्यांनी आपल्या ग्रंथपाल पदाच्या कारकिर्दीत ग्रंथांवर पुत्रवत प्रेम केले व पुर्णा नगर परिषदेच्या वाचनालयाला भव्य वाचनालयाचे स्वरुप निर्माण करुन दिले या शिवाय ग्रंथालयात येणाऱ्या प्रत्येक वाचकाशी अत्यंत आपुलकीचे संबंध जोपासत आपली कारकिर्द पार पाडली असे मनमिळावू व प्रेमळ व्यक्तीमत्व असणारे सेवानिवृत्त ग्रंथपाल डिगांबरआप्पा पाराप्पा एकलारे यांचे आज शनिवार दि.०४ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ०४-०० वाजेच्या सुमारास वयाच्या ७८ व्या वर्षी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले आहे. 

त्यांच्या पश्चात दोन मुल विश्वनाथ डिगांबरआप्पा एकलारे व सोमनाथ डिगांबरआप्पा एकलारे व दोन मुली सुना नातवंड असा मोठा परिवार असून ते माजी नगरसेवक संतोष एकलारे यांचे काका होते त्यांच्या पार्थिवावर येथील लिंगायत स्मशानभूमीत उद्या रविवार दि.०५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०-०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

 त्यांच्या पावनस्मृतीला विनम्र अभिवादन🙏🏻🙏🏻💐💐

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या