🌟पुर्णेतील श्री गुरु बुद्धस्वामी महाविद्यालयाच्या मानव्य विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांची पुर्णा नगर परिषदेस क्षेत्रीय भेट....!


🌟यावेळी मुख्याधिकारी अजय नरळे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी माहिती दिली🌟

पुर्णा (दि.24 फेब्रुवारी) - येथील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयातील मानव्य विद्या शाखेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी नगर परिषदेस दि.22 फेब्रुवारी 2023 रोजी क्षेत्रीय भेटीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्याशाखेतील लोकप्रशासन विभाग ,अर्थशास्त्र विभाग,तत्त्वज्ञान विभाग,राज्यशास्त्र विभाग ,इतिहास विभाग ,समाजशास्त्र विभाग, मराठी  विभाग ,हिंदी  विभाग आणि इंग्रजी विभाग या विभागातील सर्व  प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती.

पुर्णा नगर पालिकेचे मुख्याधिकारी श्री अजय नरळे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी माहिती तसेच नगरपरिषदेची रचना, कार्याचा आढावा , नागरी सुविधा , उल्लेखनीय कार्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ,मार्केट यार्ड रस्ते ,नाल्या ,गटारी ,दिवाबत्ती,वृक्षारोपण, पिण्याचे पाणी, घंटागाडीची व्यवस्था ,आणि शहरांमध्ये एकूण पाच  सांस्कृतिक सभागृहाची निर्मिती लोककल्याणासाठी करण्यात आली आणि सर्व विद्यार्थ्यांशी प्रश्न -उत्तरे इ. च्या माध्यमातुन  अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले . याप्रसंगी स्पर्धा परीक्षेसाठी स्वतंत्र अभ्यासिका व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी सर्व ग्रंथसंपदा उपलब्ध असुन विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आव्हान मुख्याधिकाऱ्यांनी केले . नगरपालिकेचे कर्मचारी श्री उत्तम कांबळे यांनी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सभागृह ,सार्वजनिक वाचनालय ,जन्म -मृत्यू नोंदणी विभाग ,ई -गव्हर्नस विभाग ,आस्थापना विभाग ,पाणीपुरवठा विभाग ,कर विभाग ,अग्निशामन दल  इ. विभागाची इत्यंभुत माहिती विद्यार्थ्यांना दिली .सदरील विभागात भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांना खूप शिकायला मिळाले व विद्यार्थी प्रभावित झाले.  क्षेत्रीय अभ्यास सहल यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सचिव श्री अमृतराजजी कदम , संस्थेचे अध्यक्ष मा.प्रमोदजी अण्णा एकलारे, संस्थेचे सहसचिव प्रा.गोविंदरावजी कदम , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार ,उपप्राचार्य डॉ.संजय दळवी ,उपप्राचार्या डॉ. शेख फातेमा आणि  महाविद्यालयातील प्रोफेसर डॉ. पी .व्ही.भुताळे, डॉ.प्रकाश भांगे ,डॉ.वृषाली आंबटकर , डॉ.रेखा पाटील,डॉ.सोमनाथ गुंजकर  ,डॉ.मनिषा पाटील, डॉ.विनोद कदम, डॉ. चिंचोले, प्रा. जगन्नाथ कदम, प्रा.बालाजी असोरे, डॉ. रवी बरडे ,प्रा.शिंदे आणि महाविद्यालयातील सर्व  प्राध्यापक वृंद व कर्मचारी यांनी क्षेत्रीय भेट यशस्वी होण्यासाठी  मार्गदर्शन केले  तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या क्षेत्रीय भेटीत महाविद्यालयातील एकुण 45 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या