💥पाथरी येथील प्रभारी दुय्यम निबंधक अविनाश राऊत यांचा पदोन्नती निमित्ताने सत्कार....!


💥पाथरी येथे त्यांचा कार्यालयीन सहकारी व  मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला💥

पाथरी / परभणी  : पाथरी येथील प्रभारी दुय्यम निबंधक श्री अविनाश राऊत यांची पदोन्नतीने बदली झाली आहे. या पदोन्नतीबद्दल पाथरी येथे त्यांचा कार्यालयीन सहकारी व  मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

श्री राऊत हे सध्या पाथरी येथे सहाय्यक दुय्यम निबंधक ( श्रेणी १ ) म्हणून कार्यरत होते. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे कार्यालयाने एका आदेशानुसार त्यांना पर्यवेक्षक पदी पदोन्नती बहाल केली आहे. या पदोन्नतीबरोबरच श्री राऊत यांची नोंदणी महानिरीक्षक कार्यालय पुणे येथे बदली करण्यात आली असून त्यांना पाथरी येथून कार्यमुक्तही करण्यात आले आहे. 

दरम्यान, या पदोन्नती बद्दल श्री अविनाश राऊत यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कॉंग्रेसचे गंगाखेड तालुकाध्यक्ष तथा साईसेवा प्रतिष्ठाण चे अध्यक्ष गोविंद यादव, सल्लागार अभियंता नागेश पैठणकर, पाथरी येथील दस्त लेखक संतोष ऊंबरकर, कार्यालयीन कर्मचारी नितीन वाघमारे, अजय फले, शिंपले सर, पांडूरंग वानखेडे आदिंची ऊपस्थिती होती. श्री राऊत यांना भावी कार्यकाळासाठी याप्रसंगी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या