💥वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडत्यांच्या फसवणुक प्रकरण....! :


💥या प्रकरणात २८ वर्षीय सिध्दीविनायक ट्रेडर्स मालक फरार महिला आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडुन अटक💥

(फुलचंद भगत)

वाशिम :- येथील फिर्यादी अडतदार व्यापारी तथा अध्यक्ष, अडते असोशिएशन,कृषि उत्पन्न बाजार समिती वाशिम सुरेश भगवान भोयर, वय - ५२ वर्षे, धंदा- रा. जुनी आय.ओ.डी.पी. कॉलणी वाशिम यांनी दि.२६/१०/२०२१ रोजी पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे तक्रार दिली होती की, आरोपी सिध्दीविनायक ट्रेडर्स फर्म चे कामकाज पाहणारे आरोपी क्र. १.२८ वर्षीय महिला,आरोपी क्र.२.भगवान विठठल कऱ्हाळे,वय - ३२ वर्षे व आरोपी क्र.३. विठठल लक्ष्मण कऱ्हाळे, वय- ५७ वर्षे सर्व रा. रा. उमरा संमशोदीन ता. वाशिम जिल्हा वाशिम यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम येथील ३१ अडत्यांकडुन २,११,७०,६६२ / (दोन कोटी, अकरा लाख, सत्तर हजार सहाशे बासष्ट) रूपयाचा शेतमाल घेवुन पैसे परत न देता रुपये संगनमताने विश्वासघात करुन फसवणुक केली व सदर रक्कमेचा अपहार केला अशी तक्रार दिल्याने पो.स्टे. वाशिम शहर येथे अपराध क्र.१३३७ / २०२१ कलम ४०६,४०९, ४२०, ३४ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.वरील गुन्ह्यातील आरोपी क्र.२.भगवान विठठल कऱ्हाळे, वय - ३२ वर्षे व आरोपी क्र.३.विठ्ठल लक्ष्मण कऱ्हाळे, वय - ५७ वर्षे सर्व रा. रा. उमरा संमशोदीन ता. वाशिम जिल्हा वाशिम यांना उपरोक्त गुन्हयात यापुर्वी अटक करण्यात आली होती. परंतु गुन्ह्यातील मुख्य आरोपी २८ वर्षीय महिला गुन्हा दाखल झाल्या पासुन सुमारे दिड वर्षापासुन फरार झाली होती.मा.पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह (भापोसे) यांनी सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने व शेतकरी अडतदार यांची फसवणक झालेली असल्याने गुन्हयातील फरार आरोपीचा शोध घेवुन लवकर अटक करणेबाबत आदेशित केले होते. दरम्यान दि. १५/०२/२०२३ रोजी फरार महिला आरोपीला अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकास यश मिळाले असुन आरोपीस मा.न्यायालयाने दि. २०/०३/२०२३ पावेतो ०६ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह (भापोसे) व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग वाशिम श्री. सुनिलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा, वाशिम कडील सहा.पोलीस निरीक्षक श्री. अजिनाथ मोरे, पोकॉ कैलास सरसरे, मारूती गायकवाड व मपोकॉ शर्विनी पखाले यांनी पार पाडलेली आहे....


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या