💥भारत-पाक युध्दात शहिद झालेल्या विर जवानाच्या कुटुंबास अखेर मिळाला न्याय : शहिद जवानाची जिल्हा प्रशासनात नोंद ....!


💥परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पाटील यांनी निभावली महत्वपुर्ण भुमिका💥 


💥युध्दात शत्रू सैन्याने घेरलेल्या भारतीय जवानांना रसद पुरवते वेळी शत्रुने केलेल्या हल्यात झाले होते शहिद सुर्यकांतराव जोगदंड💥


परभणी -हिंगोली संयुक्त जिल्हा असतांना देशभक्तीने प्रेरीत होऊन १० जुन १९६१ रोजी नांदेड येथे झालेल्या सैन्य भरतीत सहभाग नोदवून सैन्य दलात भरती झालेले पुर्णा तालुक्यातील विर जवान सुर्यकांत नामदेवराव जोगदंड देशाचे तत्कालीन पंतप्रधान स्व.लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या कारकिर्दीत दि.०६ सप्टेंबर १९६५ रोजी भारत-पाकीस्तान या दोन देशात झालेल्या युध्दात १२ सप्टेंबर १९६५ रोजी शहिद झाले परंतु या देशभक्त शहिद विर जवाना संदर्भात जिल्हा प्रशासनासह जिल्हा सैनिक कल्याण विभागाकडे देखील कसलीच नोंद नव्हती विशेष म्हणजे या संदर्भात यापुर्वी अनेक वेळा विनंती केल्यानंतर देखील कोणीही शहिद विर जवान सुर्यंकांत जोगदंड यांच्या विषयी सविस्तर नोंद करुन घेतली नाही या संदर्भात ०५ एप्रिल २०२२ रोजी शहिद जवानाच्या परिवारातील सदस्य शरद जोगदंड यांनी नोंद घेण्या संदर्भात अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकारी आंचल गोयल व सैनिक कल्याण विभागातील सन्माननीय अधिकारी एस.एस.पाटील यांनी सैन्य दलाशी संपर्क साधून या संदर्भात माहिती मागवली परंतु सैन्य दलाने शहिद जवानाचे सेवा दस्तावेज ०४ जुलै १९९६ जाळून नष्ट केल्याचे परभणी जिल्हा प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात नमूद करीत त्यांच्याकडे शहिद विर जवान सुर्यकांत जोगदंड यांच्या सैन्य दलातील भरती तारखेसह सन १९६५ भारत-पाक युध्दात कोणत्या तारखेला कश्या पध्दतीने विर मरण प्राप्त झाले या संदर्भात माहिती प्राप्त झाली या मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित मान्यवर अधिकाऱ्यांनी शहिद विर जवान सुर्यकांत जोगदंड यांची जिल्हा सैनिक कल्याण विभागात रितसर नोंद करुन तसे पत्र शहिद जवानाच्या कुटुंबास अखेर ५६ वर्षानंतर दि.२७ एप्रिल २०२२ रोजी न्याय मिळाला.

परभणी जिल्हा प्रशासनाकडे मात्र सन १९६५ च्या भारत-पाकिस्तान युध्दात शहिद झालेल्या या एकमेव विरजवान सुर्यकांत जोगदंड यांच्या विषयी मागील सन २०२२ पर्यंत कुठलीच माहिती उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले ही अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल सन १९६५ ते सन २०२३ या ५६ वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीत ही या विरजवानास व त्याच्या कुटुंबास योग्य सन्मान मिळाला तर नव्हताच याही पेक्षा दुर्दैवी बाब म्हणजे जिल्हा सैनिक कल्याण विभागा मध्ये या शहिद जवानाची २०२२ पर्यंत नोंद नव्हती शहिद उधमसिंघ फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही केलेल्या विनंतीस मान देऊन त्यांचे जन्मगाव असलेल्या गौर ग्राम पंचायतीने दि.२५ फेब्रुवारी २०१९ रोजी ग्राम पंचायतीच्या सर्वसाधारण सभेत सरपंच सौ.चांगुणाबाई अनंतराव पारवे यांनी ठराव क्र.०६ अंतर्गत बहुमताने ठराव पास करून शहिद विरजवान सुर्यकांत जोगदंड यांच्या स्मारकासाठी गावातील जिल्हा परिषद शाळेसमोरील जागा देण्याचा अत्यंत महत्वपुर्ण ठराव पास केला परंतु जिल्हा प्रशासनासह जिल्हा सैनिक कल्याण विभागात शहिद जवान सुर्यकांत जोगदंड यांच्या विषयी नोंदच नसल्यामुळे त्यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध होत नसल्यामुळे अद्यापही स्मारकाच्या कामाला सुरूवात झालेली नाही परंतु जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह जिल्हा सैनिक कल्याण विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी श्री.पाटील यांनी सैन्य दलाशी संपर्क साधून माहिती उपलब्ध करीत जिल्हा प्रशासनात शहिद जवान सुर्यकांत जोगदंड यांची नोंद केल्यामुळे आता त्यांच्या मुळ गौर गावी भव्य स्मारक उभारण्याच्या अडचणी आता निश्चितच दुर होणार आहे.....


💥अखेर प्रयत्नांना यश - चौधरी दिनेश (पत्रकार)


पुर्णा तालुक्यातील शहिद विर जवान सुर्यकांत जोगदंड यांना मरणोप्रांत त्यांच्यासह कुटुंबास प्रशासनाकडून यथेच्छ सन्मान व्हावा याकरिता त्यांच्या कुटुंबातील सदस्य विजय जोगदंड व शरद जोगदंड यांच्या सुचनांसह त्यांनी दिलेल्या माहिती आधारे शहिद उधमसिंघ फाऊंडेशन व प्रसार माध्यमांतून वेळोवेळी या प्रकरणावर उजेड टाकण्याचा तर प्रयत्न केलाच याशिवाय सैन्य दलातील अधिकारी व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना वेळोवेळी ही बाब निदर्शनास आणून दिल्याने अखेर या शहिद जवानासह त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला...

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या