💥जिंतूर येथे पतंजलीच्या इंटिग्रेटेड योग शिबिराचा समारोप....!


💥समारोप कार्यक्रमात व्यासपीठावर हभप.मधुकर महाराज रिडजकर यांची प्रामुख्याने उपस्थिती💥 


जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.07 फेब्रुवारी) - येथे पतंजली योग समितीच्या वतीने सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात दि 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 5:30 ते 7:30 च्या दरम्यान मोफत इंटिग्रेटेड योगा शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा समारोप सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

                 समारोप कार्यक्रमात व्यासपीठावर हभप.मधुकर महाराज रिडजकर, पतंजलीचे जिल्हा प्रभारी धोंडीराम शेप, यादवराव साखरे, बापू देशमुख, तालुका मिडिया प्रभारी सचिन रायपत्रीवार, जिल्हा मीडिया प्रभारी गजानन चौधरी, प्रदिप कोकडवार,उद्धवराव सूर्यवंशी,अग्रवाल, केंद्रे, शुभांगीताई जाधव, प्रतिभाताई साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात पतंजलीचे पदाधिकारी व योगशिक्षक यांनी दररोज उपस्थित योग साधकांना प्राणायाम, योगासने, सूर्यनमस्कार यांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

                   योग समितीचे तालुका प्रभारी उद्धवराव सूर्यवंशी, सचिन रायपत्रीवार, बी.डी. रामपूरकर, सौ मोहिनी दराडे, लखूजी जाधव, पुरुषोत्तम अंभूरे, जि. के. देशपांडे, सखाराम निलंगे, राजेंद्र देशमुख, श्रीराम कडे, राम रेघाटे, गुलाब साबळे, पांडू भोंबे, रामराव चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या