💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/बातम्या.....!


💥केंद्रीय मंत्री अमित शहांचा इफेक्ट ? भाजपने बेळगाव महापालिकेत बसवला मराठी महापौर💥

✍️ मोहन चौकेकर

* रोक सको तो रोक लो...कसब्यासाठी भाजपचा उद्या तीन वाजेपर्यंचा काँग्रेसला अल्टिमेटम

* भाजपमधून आलेल्या नाना पटोले यांना चार वर्षात महत्त्वाची आठ पदं का? काँग्रेसमध्ये दुसरे नेते नाहीत का ? आशिष देशमुखांचा हायकमांडला सवाल.

* काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर,नाना पटोलेंच्या विरोधात बाळासाहेब थोरातांची हायकमांडकडे तक्रार.

* केंद्रीय मंत्री अमित शहांचा इफेक्ट ? भाजपने बेळगाव महापालिकेत बसवला मराठी महापौर.

* अदानी प्रकरणात 'दूध का दूध,पानी का पानी' होऊन जाऊ द्या ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.

* आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण, Nifty 18000 च्या आत तर Sensex 335 अंकांनी घसरला.

* टाटा मोटर्सचा ग्राहकांना धक्का, हे SUV बेस्ट सेलिंग मॉडेल केलं बंद.

* तुर्कस्तान की भूकंपस्थान...गेल्या 24 तासात तुर्कीला भूकंपाचे तब्बल 39 धक्के, 1700 हून अधिक मृत्यू.

* प्रतिक्षा संपली : ‘पठाण’ चित्रपट अमेझॉन प्राइमवर २५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार, ‘बॉलिवूड लाइफ’ने दिली माहिती 

* शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा झटका, नाशिकमधील जवळपास 50 हून अधिक शिवसैनिकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश

* एका आठवड्यात पतंजली फूड्सचे मार्केट कॅपिटल घसरून कंपनीला 7000 कोटी रुपयांचे नुकसान, 5 महिन्यांत 18,000 कोटी रुपयांचे नुकसान.

* राज्यात थंडी वाढणार, बुधवापासून कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता ; उत्तर भारतात बर्फवृष्टी अन् पावसाचा अंदाज - हवामान विभाग

* मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी, अवघ्या 7 महिन्यांत 3,600 रुग्णांना 28 कोटींपेक्षा अधिक रुपयांची केली वैद्यकीय मदत.

* चिंचवड व कसबा या दोन्ही विधानसभा पोटनिवडणुका बिनविरोध होण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  

* युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांना पदावरून डच्चू दिला जाणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी मिलिट्री इंटेलिजेन्सचे प्रमुख किर्लो बुदानोव्ह यांच्या नावाची केली घोषणा.

* एकीकडे काँग्रेसची भारत जोडो यात्रा पूर्ण तर आता काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, नाना पटोलेंच्या विरोधात बाळासाहेब थोरातांची हायकमांडकडे तक्रार.

* राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 जाहिरात क्रमांक 099/2022 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द, MPSC ची माहीती.

* कुटुंबियांच्या सुखासाठी झटणाऱ्या बापाची गोष्ट सांगणाऱ्या 'घोडा' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज, सिनेमा 17 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार.

* नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; उद्यापासून सुरु होणार बेलापूर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत वॉटर टॅक्सी.

* सीरिया,तुर्कस्तानमध्ये भूकंप;1300 जणांचा मृत्यू, आकडा अजूनही वाढण्याची भीती.

* पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 10 फेब्रुवारीच्या दौऱ्यापूर्वी मुंबई पोलिसांनी जारी केले प्रतिबंधात्मक आदेश; ड्रोन आणि इतर उड्डाण उपक्रमांवर बंदी.

* अदानी प्रकरणी काँग्रेस आक्रमक; महाराष्ट्रासह देशभरात LIC, SBI कार्यालयाबाहेर आंदोलन.

* कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस लढवणार पक्षाकडून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर ; नाना पटोले यांची माहिती.

* कापसाचे भाव पुन्हा घसरले!:प्रतिक्विंटल 7 हजार 900 रुपयांवर, सरकीच्या दरात घसरण, आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी घटल्याने फटका.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या हेलिकॉप्टर कारखान्याचं लोकार्पण

* भारत तुर्कस्तान व सिरीया मध्ये मदत पाठवणार: तुर्कस्तान-सीरियामध्ये भूकंपाने आतापर्यंत 1800हून अधिक मृत्यू; 100 सदस्यीय एनडीआरएफचे पथक, वैद्यकीय मदत पाठवण्यात येणार.

* राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या मुलाची राजकारणात एन्ट्री, राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रतीक पाटील यांची बिनविरोध निवड.

* गुगल, फिलिप्सपाठोपाठ आणखी एका टेक कंपनीचा कर्मचाऱ्यांना धक्का, Dell Technology पुढील तीन वर्षात 6000हुन अधिक जणांची कपात करणार. 

* अनिल देशमुख यांना मोठा दिलासा, अनिल देशमुखांना मुंबई बाहेर जाण्यास न्यायालयाची परवानगी ; नागपूरमध्ये जाण्यासाठी न्यायालयात केली होती मागणी. 

* चीनच्या हुनान प्रांतात भीषण रस्ता अपघात: 10 मिनिटांत 50 वाहने एकमेकांवर आदळली, 16 जणांचा मृत्यू तर 66 जण जखमी.

* गायिका बियॉन्सेचा 32 ग्रॅमी पुरस्कार मिळवण्याचा विक्रम, बियॉन्सेने यावर्षी 4 ग्रॅमी पुरस्कार जिंकले; सर्वाधिक 32 ग्रॅमी पुरस्कार मिळवण्याचा मान. 

* शेअर बाजारात आज घसरण: सेन्सेक्स 60,506.90 (-334) वर बंद,तर निफ्टी 17,764.60 (-89) च्या पातळीवर बंद.

* लतादीदीं मंगेशकरांची आज पुण्यतिथी : मुंबईतल्या कोस्टल रोडला लता मंगेशकर यांचे नाव देण्यात यावे, उषा मंगेशकर यांनी केली मागणी.

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या