💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या.....!


💥रमेश बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल, मराठीतून घेतली राज्यपालपदाची शपथ💥

 ✍️ मोहन चौकेकर

* 5 वर्षात राज्यांची रखडलेली GST रक्कम 16982 कोटी रुपये राज्यांना परत करण्याचा निर्णय, GST कौन्सिलच्या 49 व्या बैठकीत निर्णय

* रमेश बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल, मराठीतून घेतली राज्यपालपदाची शपथ, राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधीचा पार पडला सोहळा 

* पदवी प्रवेशासाठी केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा म्हणजेच सीयूईटीचे गुण स्वीकारा; यूजीसीचे उच्च शिक्षण संस्थांना आवाहन

* दक्षिण अफ्रिकेतून भारतात  आणले 12 चित्ते, या 12 चित्त्यांना मध्य प्रदेशातील कूनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येणार 

* पुण्यात ठाकरे गट आणि शिंदे गटात राडा, महिला कार्यकर्त्याही भिडल्या, घोषणाबाजी करत बाचाबाची झाल्याने तणाव, पोलिसांकडून कारवाई

* महिला प्रीमियर लीग 2023: कर्णधाराची घोषणा करणारा RCB ठरला पहिला संघ, आरसीबीने स्मृती मंधानाला बनवले कर्णधार 

* बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वेब सीरिजचं दिग्दर्शन करणार, आगामी वेब सीरिज ‘हीरामंडी’ चा फर्स्ट लुक चर्चेत

* पदवी प्रवेशासाठी केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा म्हणजेच सीयूईटीचे गुण स्वीकारा ; यूजीसीचे उच्च शिक्षण संस्थांना आवाहन

* सीरियातील होम्समध्ये प्राणघातक हल्ला, जवळपास 53 लोकांचा मृत्यू; ISIS वर हल्ल्याचा संशय व्यक्त

* नांदेडमध्ये महाशिवरात्री निमित्ताने महाप्रसाद घेण्यासाठी थांबलेल्या नागरिकांना कारची धडक; मोहाडी येथील घटनेत 7 भाविक जखमी 

* भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर हल्ला करत काचा फोडणाऱ्या 3 जणांना अटक ; पृथ्वी शॉने सेल्फी देण्यास नकार दिल्यामुळे घडला होता प्रकार

* मुंबईत भाजपा आणि शिंदे गटाकडून तर्फे 227 वॉर्डमध्ये शिवजयंती कार्यक्रम होणार ; आघाडी व मोर्चे मिळून 346 ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाणार

* महिला टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडचे भारतासमोर 152 धावांचे आव्हान, रेणुका सिंगने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या 

* निक्की यादव हत्याकांडात आरोपी साहिलच्या कुटुंबियांचाही होता समावेश ; पोलीस तपासांत धक्कादायक माहिती उघड

* ठाकरे गटाचा निवडणूक आयोगाकडे 6 खासदार बाजूने असल्याचा दावा, मात्र प्रत्यक्षात 4 खासदारांचीच शपथपत्रं निवडणूक आयोगाकडे सादर

* तुर्की आणि सीरियातील भूकंपबळींचा आकडा 45 हजारांवर, दोन्ही देशांत मिळून 9 लाखांहून अधिक लोक बेघर 

* मिर्झापूर फेम अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे निधन; 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

* शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांवर व्हिप लावू शकत नाहीत - अ‍ॅड. श्रीहरी अणेंची 

* बंगळुरू येथे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ युवा महोत्सव:अमरावतीचा संघ घोषित, दीड डझनहून अधिक कलावंतांचा सहभाग

* राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवस तामिळनाडू दौऱ्यावर

* सतत फोन चेक करण्याची सवय ठरू शकते घातक; मेंदूवर होत आहे अनेक दुष्परिणाम, अभ्यासात धक्कादायक खुलासा

* अमित शाह यांची नागपूरमध्ये दिक्षाभूमीला भेट ; आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे घेतले दर्शन

* तालिबानने घातली गर्भनिरोधकांवर बंदी, म्हटले- 'हे मुस्लिमांची लोकसंख्या रोखण्याचे पश्चिमी देशांचे षडयंत्र'

* चोरांना धडा शिकवणार, चोरलेला धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला समोर या; एकनाथ शिंदेंना ठाकरेंचं खुलं आव्हान..

* देशात लोकशाहीच्या नावाने राजकीय हिंसाचार, आम्ही फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेऊ; संजय राऊतांचा विश्वास..

* मैदानी परीक्षेदरम्यान भोवळ आली अन् तो कोसळला; मुंबईत पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू  

* प्रत्येक विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र प्रवेशावेळी झडती घेणार; औरंगाबादेत दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी आढावा बैठक  

* भारतात नवे पाहुणे आफ्रिकेतून 12 चित्ते भारतात दाखल, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये प्रवेश  

* तीन वर्षापूर्वी निक्की यादव आणि साहिलचं लग्न, लिव्ह इन सांगून तपास भरकटवण्याचा प्रयत्न; साहिलच्या वडीलांसह पाच जणांना अटक  

* बॉर्डर-गावस्कर मालिकेतील दुसऱ्या टेस्टमध्ये अक्षर पटेल आणि आर आश्विन यांच्या शतकी भागीदारीने भारताचं कसोटीत पुनरागमन दिल्ली कसोटी रोमांचक स्थितीत, दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडे 62 धावांची आघाडी.....

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या