💥पुर्णा तालुक्यातील देगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्री छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी....!


💥यावेळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष गंगाधर इंगोले यांची प्रामुख्याने उपस्थिती💥

पुर्णा (दि.२० फेब्रुवारी) - तालुक्यातील देगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्री छत्रपति शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


यावेळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष गंगाधर इंगोले उपाध्यक्ष यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले या प्रसंगी हिरामण वाटोडे,मंचक नवघरे,नरहरि इंगोले व शाळेचे मुख्याध्यापक गोविन्द कानडखेडकर सर यांच्यासह गावकरी मंडळी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या