🌟डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहण्याचे काम माता रमाईने केले - अमितभाऊ भुईगळ


🌟महाराष्ट्राचे प्रख्यात गायक मेघानंद जाधव यांच्या भिमगीत जलसा कार्यक्रमात बोलतांना अमितभाऊ भुईगळ म्हणाले🌟


परभणी -: अजिंठा नगर परभणी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यागमुर्ती माता रमाई यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्राचे प्रख्यात गायक मेघानंद जाधव यांच्या भिमगीत जलसा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने परिसरातील नागरीकांनी या भिम गीताचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी भिमाच्यामुळे पोरगं माझ घेऊन फिरते सफारी " या गाण्यावर तमाम श्रोत्यांनी मनमुराद आनंद घेऊन गाण्याला दाद दिली. "


या प्रसंगी विशेष उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे युवा माजी प्रदेश अध्यक्ष व पक्षनिरीक्षक अमितभाई भुईगळ यांनी आपले विचार मांडतांना म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहण्याचे काम माता रमाईने केले. म्हणूनच आज आपणास हे वैभव प्राप्त झाले. माता रमाई नंतर व डॉ. बाबासाहेब आंबेडकरानंतर ख-या अर्थाने बाबासाहेबांचा वारसा पुढे घेवून जाण्याचे काम त्यांचे नातू अॅङ बाळासाहेब आंबेडकर मागील 40 वर्षापासून काम करत आहेत. यामुळे आपण अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी लोकनेते विजय चाकोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की माता रमाई यांनी बाबासाहेबांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर बनविले घटनेचे शिल्पकार बनविले अशा त्यागमुर्ती माता रमाई यांचा आदर्श सर्व महिलांनी घेतला पाहीजे असे आपले विचार व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमाचे उदघाटन वंचित बहुजन आघाडीचे नेते आलमगीर खान यांनी केले व आपले जयंती प्रसंगी मनोगत व्यक्त केले. तसेच बहुजन समाज पार्टीचे शहर अध्यक्ष दिलीप बोरकर यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षात जाहीर प्रवेश केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन गंगाखेडकर यांची उपस्थिती होती तर स्वागत अध्यक्ष सुनिताताई साळवे यांची उपस्थिती होती. तसेच डॉ.धर्मराज चव्हाण, डॉ. सुरेश शेळके, धम्मपाल सोनटक्के, प्रा. प्रविण कनकुटे, इंजि. सरदार चंदासिंग, सर्जेराव पंडित, कलिम खान, तुषार गायकवाड, प्रमोद कुटे, भाऊसाहेब गुळवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अतुल वैराट यांनी केले तर प्रास्ताविक संदिप खाडे यांनी केले तर आभार लखन सौंदरमल यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक संदिप खाडे, लखन सौंदरमल, मिलिंद खंदारे, सिध्दार्थ शिवभगत वंचित बहुजन आघाडी यांनी परिश्रम घेतले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या