💥श्री.बिरलबलनाथ महाराज यात्रा महोत्सवा निमित्य पोलीस अधिक्षक यांची बिरबलनाथ मंदीर व यात्रा मैदान मंगरुळपीरला भेट...!


💥बिरबलनाथ मंदीरासह यात्रा मैदानाला भेट देवून मंदीराच्या व यात्रेच्या परीसराची केली पाहणी💥


(फुलचंद भगत)

वाशिम:-मंगरूळपीर येथे दिनांक ०८/०२/२०२३ रोजी पासून दिनांक १९/०२/२०२३ पर्यंत चालणाऱ्या श्री. बिरबलनाथ महाराज यात्रा महोत्सव निमीत्य दिनांक ०४/०२/२०२३ रोजी मा. पोलीस अधिक्षक सा. वाशिम श्री. बच्चनसिंह यांनी बिरबलनाथ मंदीर तसेच यात्रा मैदान ला भेट देवून मंदीराच्या व यात्रेच्या परीसराची पाहणी केली. बिरबलनाथ महाराज मंदीराचे विश्वस्त व पोलीस स्टेशन मंगरुळपीरचे ठाणेदार श्री. सुनिल हूड यांना मंदीर परीसर तसेच यात्रा परीसर येथे सिसिटीव्ही कॅमेरे लावणे बाबत, गर्दी नियंत्रण ठेवण्या करीता


पार्कंग व्यवस्था,बॅरीगेंटींग करणे बाबत सुचना दिल्या. तसेच मंदीरात दर्शना करीता स्त्री व पुरुषांचे वेगवेगळया लाईन लावणे बाबत सुचना दिल्या. मंदीराचे वतीने मा. पोलीस अधिक्षक सा. वाशिम यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. सदर वेळी संस्थानचे विश्वस्थ श्री. रामकुवंरसिंह रघुवंशी, अविश रघुवंशी, बालदेव येथील पोलीस पाटील श्री. तेलंग, तसेच मा.ऊपविभागीय पोलीस अधिकारी मंगरुळपीर श्री. जगदीश पांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, सोमनाथ जाधव, जिल्हा विशेष शाखा वाशिम चे स.पो.नि. झळके व पोलीस स्टॉप हजर होते. बिरबलनाथ महाराज यात्रेच्या नियोजनाबाबत विश्वस्थांना विचारपूस करुन यात्रा सुरळीत पार पाडण्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ते मार्गदर्शन केले.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या