💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या....!💥'मानसिक संतुलन बिघडलं का ?' शरद पवारांवरच्या विधानानंतर अजितदादांचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात💥

✍️ मोहन चौकेकर 

* उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाचा मोठा धक्का; शिवसेना नाव व धनुष्य बाण हे चिन्ह  एकनाथ शिंदें गटाकडे ; या निर्णयामुळे महाराष्ट्राचा रखडलेला मंत्रीमंडळात विस्तार व मुंबई महापालिकेसह राहीलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकासह नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता लवकरच घोषित होण्याची शक्यता.

* 'मानसिक संतुलन बिघडलं का ?' शरद पवारांवरच्या विधानानंतर अजितदादांचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात.

* आम्ही पहिल्यापासून सांगत होतो, खरी शिवसेना हीच आहे. कारण शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे. कुणीही शिवसेनेवर खासगी मालमत्ता म्हणून अधिकार सांगू शकणार नाहीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया.

* तक्रार देऊनही आमची तक्रार घेतली नाही, पतीच्या आणि माझ्या जीवाला धोका, आम्हाला टार्गेट केलं जातंय नताशा आव्हाडचा आरोप.

* खासदार नवनीत राणा यांच्या वडिलांना दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार,मुंबई सत्र न्यायालयाने शिवडी न्यायालयाचे आदेश ठेवले कायम.

* गिरीश बापट आजारी असताना त्यांना निवडणूक प्रचारात आणणं कितपत योग्य? अजित पवारांचा भाजपला सवाल.

* त्रास गिरीश बापटांना होत होता; पण यातना आम्हाला जाणवत होत्या, आता आम्ही व्यक्तिश : प्रचार करणार नाही, आनंद दवे यांचा मोठा निर्णय.

* समंथाने नाकारली Pushpa 2 ची मोठी ऑफर ? अल्लू अर्जुन नाराज ?

* ‘रावरंभा’ चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस ; अभिनेता शंतनू मोघे साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका.

* तुर्कीमध्ये भूकंपाच्या 260 तासांनंतर वाचला 14 वर्षांच्या उस्मानचा जीव.

* आयपीएल 2023 चे वेळापत्रक जाहीर, गतविजेता गुजरात टायटन्स चैन्नईसोबत खेळणार मोसमातील पहिला सामना.

* पालघर जिल्ह्यातील बोईसर-तारापूर परिसरातील फार्मा कंपनीत स्फोट; एक ठार, चार जखमी.

* शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची जाहीर:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिली माहिती, 23 फेब्रुवारीपर्यंत नोंदवता येतील आक्षेप.

* सहलीवर आलेल्या 84 विद्यार्थ्यांना अहमदनगरमध्ये अन्नातून विषबाधा:विद्यार्थ्यांवर शिर्डी संस्थेच्या रुग्णालयात उपचार सुरू.

* कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी:लाल कांद्याच्या भावात मोठी घसरण,  सरासरी 700 ते 1 हजार भाव.

* अदानी प्रकरणात केंद्राची सूचना सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, तपासासाठी स्वतःच बनवणार समिती....

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या