💥परभणी जिल्हा समाज कल्याण कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन....!


💥आयुक्त श्रीमती गिता गुठ्ठे यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले💥

परभणी (दि.२० फेब्रुवारी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण कार्यालयात समाजकल्याण सहायक‍ आयुक्त श्रीमती गिता गुठ्ठे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

कार्यालयातील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एम. एम. पेदेवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन अधीक्षक बी. एन. स्वामी यांनी केले. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्य गीताने कार्यक्रमाची सुरुवात व राष्ट्र गीताने समारोप करण्यात आला.  

सहायक आयुक्त कार्यालयाच्या अधिनस्त शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृहात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’च्या निमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे ‘राज्यगीत’ स्वीकृत व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक, इतर कर्मचारीवृंद व प्रवेशित विद्यार्थी-विद्यार्थिानी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या