💥नांदेड येथे येणाऱ्या शिख भाविकांसाठी 'तेलंगाना भवन' निर्माण करण्यासाठी तेलंगानाचे मुख्यमंत्री केसीआर यांना साकडे....!


💥तेलंगानातल्या वरंगल येथे असलेली गुरुद्वाराची 162 एकर जमीन शिखांच्या ताब्यात देण्याचीही मागणी💥

नांदेड (दि.०६ फेब्रुवारी) - हैदराबाद व तेलंगाना भागातून शिख भाविक मोठ्या प्रमाणात नांदेड येथे सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी येतात या भाविकांसाठी तेलंगाना सरकारच्या वतीने तेलंगाना भवन निर्माण करावे तसेच तेलंगानातल्या वरंगल येथे असलेली गुरुद्वाराची 162 एकर जमीन ताब्यात द्यावी या मागणीचे साकडे रणजीतसिंग गिल, राजेंद्रसिंग पुजारी व हरभजनसिंग पुजारी यांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याकडे केली आहे.

    नांदेड शहर पूर्वीपासून आंध्रा व तेलंगणाचा अविभाज्य भाग होते तसेच या विभाजनानंतर देखील हैदराबाद तेलंगणा व नांदेडचा मोठा जिव्हाळा कायम आहे. तेलंगणा राज्यात दररोज हजारो सिख भाविक  गुरुद्वारा सचखंड येथे दर्शनासाठी येतात. त्यांच्या सुविधेसाठी भारत राष्ट्रसमितीने तेलंगाना भवन नांदेड शहरात उभारून व्यवस्था करावी या मागणीचे साकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याकडे केले आहे.

   सिख धर्मियांची दक्षिण काशी मानल्या जाणाऱ्या नांदेड शहरात भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून के चंद्रशेखर राव प्रवेश करण्याचा मानस ठेवत आहेत. ही अत्यंत अभिनंदनीय बाब असल्याचे निवेदनात नमूद करून रणजीतसिंग गिल, गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य राजेंद्रसिंग पुजारी व हरभजनसिंग पुजारी यांनी दोन्ही राज्यातील जिव्हाळा काय ठेवण्यासाठी तेलंगाना भवन निर्माण करून वरंगल येथील गुरुद्वारासाठीची 162 जमिनीचा शीख धर्मीयांना ताबा द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री राव यांची भेट घेऊन केली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या