💥राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे मृत्यू प्रकरणी जिंतूर पत्रकारांचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन...!


💥यावेळी तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते💥


 
जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

राजापूर तालुक्यातील अन्याया विरुद्ध धडधडणारी तोफ म्हणून ओळखले जाणारे दैनिक महानगरी टाइम्सचे झुंजार पत्रकार शशिकांत वारीशे यांची भ्याड हत्या करण्यात आल्यांच्या संशय असून महाराष्ट्र पत्रकार संघ तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया जिंतूर या हत्ते चा तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे  निवेदन जिंतूर तहसीलदारामार्फत दि.10 फेब्रुवारी  मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत पाठवण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की वारीशे सातत्याने रिफायनरी विरोधी जनमतांचा आवाज बुलंद करीत होते. त्यांची शेवटची बातमी सहा फेब्रुवारी 2023 च्या महानगरी टाइम्स मध्ये आंगणेवाडी यात्रेनिमित्त बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती .त्यातील आरोपी रिफायनरी प्रस्तावित होऊ शकणाऱ्या भागात जमिनींचे व्यवहार करणारा आहे असा आरोप ही निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की सदरील संशयित आरोपीने वारीशे यांना राजापूर महामार्ग पेट्रोल पंपावर पाहिले व बेसावध असताना त्यांच्याच दुचाकी वर वाहन चढून हत्या केली असा आरोप ही करण्यात आला आहे वारीशे यांची हत्या म्हणजे लोकशाही वर निघून हल्ला होय.

अशा प्रकारे दिवसाढवळ्या पत्रकारांची हत्या होणे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पत्रकारवर जीवे मारणे, शिवीगाळ करणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक असल्याचे म्हटले आहे.शशिकांत वीराशे यांच्या मरणालाकारणीभुत संशयास्पद  व्यक्तींची सखोल चौकशी करून दोषीवर लवकरात लवकर  कार्यवाही करण्याची विनंती महाराष्ट्र पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मीडिया जिंतूर  पत्रकारांनी केली आहे.आज जिंतूर येथील पत्रकारांनी निषेध म्हणून काळ्या फित लावून तहसीलदारांना निवेदन दिले.

यावेळी पत्रकार अजमत पठाण (अध्यक्ष ई.मी.), बि.डी. रामपूरकर महाराष्ट्र प.सं. रा. सदस्य, शेख रहीम उपाध्यक्ष ई. मी., कयूम खान पठाण, एम एजाज जिंतूरकर, भागवत चव्हाण, शेख अलीम, रामप्रसाद कंठाळे, रामकिशन ठोंबरे, गणेश पालवे, चंदन कुमार वाकळे आधी अनेक पत्रकारांच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या