💥नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेसच्या एका डब्ब्याचे ब्रेक लाईनर जाम झाल्यामुळे धुर निघायला सुरुवात....!


 💥प्रवाश्याच्या सतर्कते मुळे अनर्थ टळला💥 

परभणी (दि.०४ फेब्रुवारी) - नांदेड मुंबई तपोवन (१७६१७) एक्स्प्रेस या प्रवासी गाडीच्या एका डब्ब्याचे ब्रेक लाईनर जाम झाल्या मुळे प्रचंड धूर निघल्याचा गंभीर प्रकार आज शनिवार दि.०४ फेब्रुवारी २०२३ रोजी परभणी ते मानवत रोड रेल्वे स्टेशन दरम्यान घडला सदरील प्रकार काही प्रवाश्यांच्यां लक्षात आल्यानंतर एकच गोंधळ माजला यावेळी प्रवाश्यांनी या संदर्भात रेल्वे मॅनेजर (गार्ड) ला तात्काळ  सांगितले.

प्रवाश्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला या घटनेत सुदैवाने यात कोणतीही अप्रीय घटना घडली नाही..... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या