🌟परभणी जिल्ह्यात यापुढे सिमेंटचेच रस्ते नितीन गडकरी यांची ग्वाही : डांबरी रस्ते बंद करणार....!


🌟परभणी बाह्यवळण रस्त्याच्या भूमीपूजनासह अन्य कामांच्या कोनशिला समारंभाप्रसंगी ते बोलत होते🌟

परभणी (दि.25 फेब्रुवारी) : वारंवार उखडणार्‍या रस्त्यांच्या पार्श्‍वभूमीवर यापुढे परभणी जिल्ह्यात डांबरा ऐवजी केवळ सिमेंटचेच रस्ते सरकारी यंत्रणांमार्फत उभारले जातील, अशी महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

         वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात शनिवार दि.25 फेब्रुवारी 2023 रोजी परभणी बाह्यवळण रस्त्याच्या भूमीपूजनासह अन्य कामांच्या कोनशिला समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, आमदार विप्लब बाजोरीया, ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सुरेशदादा देशमुख, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, शिवसेनेचे महानगर जिल्हाप्रमुख तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य प्रविण देशमुख, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रफुल्ल पाटील, ज्येष्ठ नेते ज्ञानोबा मुंढे आदी व्यासपीठावर विराजमान होते.

          याप्रसंगी गडकरी यांनी परभणी जिल्ह्यातील माती काळी आहे. खोलपर्यंत ती काळीच आहे. त्यामुळेच रस्ते हे खचत आहेत. डांबरी रस्ते व पाण्याचे वावडे आहे, त्यामुळे रस्ते टिकत नाहीत, हे आपल्या पूर्णपणे लक्षात आले असून त्यामुळेच यापुढे या जिल्ह्यात राज्य असो, केंद्र सरकारच्या योजनांमधून सिमेंटचेच रस्ते बांधले जातील, अशी ग्वाही दिली. शहर असो, ग्रामीण भागातील खेडीपाडीसुध्दा सिमेंटच्या रस्त्यानेच जोडल्या जावीत, म्हणून प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट केले. सिमेंटचे रस्ते चांगले व दीर्घकाळ टिकतील, असेच असतील, असे ते म्हणाले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या