💥पुर्णा शहरात त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांचा १२५ वा जयंती महोत्सव उत्साहाने साजरी...!


💥यावेळी माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त त्यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली💥


पूर्णा (दि.०७ फेब्रुवारी ) - पुर्णा शहरात आज मंगळवार दि.०७ फेब्रुवारी २०२३ रोजी भारतरत्न महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविध्द पत्नी त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांचा १२५ वा जयंती महोत्सव अत्यंत उत्साहानं साजरा करण्यात आला. 

यावेळी माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त त्यांच्या तैलचित्राची दुपारी १२-०० वाजेच्या सुमारास शहरातील डॉ.आंबेडकर नगर परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली सदरील मिरवणूक सिद्धार्थ नगर,रेल्वे कॉलनी,विजय नगर,भीम नगर कॉर्नर,कुरेशी मोहल्ला,दयानंद चौक,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,महात्मा बसवेश्वर चौक,या परिसरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आल्यानंतर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. 


त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर जयंती मिरवणूकी मध्ये बौद्ध उपासक उपासिका व बालक बालिका व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली पूज्य भदंत पय्यावंश यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक व धम्मदेशना पूज्य भदंत डॉ उपगुप्त महाथेरो व पूज्य भदंत पय्यावंश यांनी उपासक व उपासिका यांना देण्यात आली तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत सुद्धा करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रीकांत देवराव हिवाळे सर,( तालुकाध्यक्ष भारतीय बौध्द महासभा पूर्णा ),स्वागताध्यक्ष विश्वकन्याबाई शेषराव कांबळे (अध्यक्षा, माता रमाई महिला मंडळ डॉ.आंबेडकर नगर,पूर्णा ) प्रमुख वक्त्या आई सुप्रियाताई कासारे (केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख भारतीय बौध्द महासभा मुंबई ), आयु.ॲड. चित्ररेखा कांबळे ( केंद्रीय शिक्षिका, नांदेड), आयु.ज्योती बगाटे ( जिल्हा कोषागार अधिकारी, नांदेड ) तसेच सत्कारमूर्ती आयु.डॉ.पिंकी डांगे,आयु.डॉ.स्नेहल संदीप जोंधळे, आयु.अंजना बिडगर, तसेच प्रकाश दादा कांबळे ( जेष्ठ आंबेडकरी विचारवंत पूर्णा ) ॲड. हर्षवर्धन गायकवाड, प्राचार्य राम धबाले,ॲड.धम्मा जोंधळे विरेश कसबे,मिलिंद कांबळे,अशोक धबाले, डॉ. संदीप जोंधळे, व सर्व आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी, भारतीय डॉ.बी.आर आंबेडकर स्मारक बुद्ध विहार समिती पूर्णा, बौद्ध महासभा तालुका व शहर शाखा पूर्णा, समता सैनिक दल पूर्णा, व सर्व महिला मंडळ पूर्णा इत्यादींचे उपस्थितीत जयंतीचा समारोप करण्यात आला.....

✍️वृत्त संकलन/छायाचित्रे  : दिपक साळवे पुर्णा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या