🌟परभणीत राज्यस्तरीय कृषी संजीवनी महोत्सवाचे थाटामाटात उद्घाटन....!


🌟यावेळी आ.सौ.मेघना साकोरे-बोर्डीकर व आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 


परभणी (दि.24 फेब्रुवारी) - शहरातील वसमत रस्त्यावरील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर स्व.अ‍ॅड.शेषराव भरोसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संजीवनी मित्रमंडळाने दि. 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कृषी संजीवनी महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दि.24 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.


           यावेळी आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष तथा संयोजक आनंद भरोसे, माजी नगरसेवक शिवाजी भरोसे, प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेश देशपांडे, मोहन कुलकर्णी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह नागरिक उपस्थित होते.  यावेळी जिल्ह्यातील 5 प्रगतशील शेतकर्‍यांचा संयोजकांच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

          दरम्यान, या तीन दिवशी प्रदर्शनात  महिला बचतगट मेळावा, सोयाबीन, ऊस, हरभरा, दुग्धव्यवसाय, पाणी व्यवस्थापन या विषयावर पीक परिसंवाद होणार आहे. या महोत्सवात शेतकर्‍यांना औजारांची प्रात्यक्षिके पाहायला मिळणार आहेत.

          कृषी संजीवनी महोत्सव हे 10 एकरात होत असून यात 5 दालने उभारण्यात आले आहेत. हे दालन अत्याधुनिक असून डोम पद्धतीचे भव्य जम्बो मंडप उभारले आहेत. तसेच प्री फॅब्रिकेटेड स्टॉल्स उभारले आहेत. या प्रदर्शनात कृषी उत्पादनाचे अनेक स्टॉल सहभागी  झाले आहेत.

         कृषी प्रदर्शनात शासनाचे विविध विभाग, आधुनिक तंत्रज्ञान, बी बियाणे, शेंद्रीय शेती पद्धती, गांडूळ खत निर्मिती, पशु खाद्य, ट्रॅक्टर, आधुनिक शेती अवजारे, रासायनिक खते, कृषी मार्गदर्शक पुस्तके, ठिबक सिंचन, सोलर उत्पादने, महिला बचत गटाची उत्पादने, गृहोपयोगी वस्तू धान्य महोत्सव असे अनेक स्टॉल लावण्यात आले आहेत. याच बरोबर फूड कॅन्टीन, लहान-मुलांसाठी विविध खेळणी प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती संयोजन समितीने दिली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या