💥पुर्णा येथील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी....!


💥राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.पुष्पा गंगासागर यांनी संत सेवालाल महाराजांच्या जीवन कार्याविषयी यावेळी माहिती दिली💥

पूर्णा (दि.15 फेब्रुवारी) - येथील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात राष्ट्र संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय दळवी यांच्या हस्ते श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ पुष्पा गंगासागर यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवन कार्याविषयी उपस्थितांना माहिती दिली.

प्राचार्य डॉ के. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाधिकारी डॉ अजय कुऱ्हे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी डॉ रवी बर्डे, कार्यालयीन अधीक्षक अरुण डूब्बेवार, बाळासाहेब कुलकर्णी, गिरीश शिवणकर , आनंद पाटिल तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या