🌟पुर्णेतील सौ.सुवर्णा अरविंद महाजन यांचे हिगोली येथे अपघाती निधन...!


🌟त्या गोदावरी अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक अरविंद महाजन यांच्या पत्नी होत्या🌟

पुर्णा (दि.२५ फेब्रुवारी) - येथील गोदावरी अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक अरविंद महाजन यांच्या पत्नी सौ.सुवर्णा अरविंद महाजन या आपल्या माहेरी हिंगोली येथे गेल्या असता त्यांचे आज शनिवार दि.२५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०-०० ते १०-३० दरम्यान हिंगोली येथील औंढा मार्गावरील खाकी बाबा मठा जवळील पंचफुलाबाई फकिरा दराडे शाळे समोर झालेल्या भिषण अपघातात दुःखद निधन झाले.

 त्यांच्या पश्चात पती अरविंद महाजन शाखा व्यवस्थापक गोदावरी अर्बन बँक,सासू,एक मुलगा एक मुलगी असा परिवार असून त्यांचा अंत्यविधी आज शनिवार दि.२५ फेब्रुवारी रोजी पुर्णा येथील लिंगायत स्मशानभुमीत सायंकाळी ०६-०० वाजेच्या सुमारास होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या