💥जिंतूर तालुक्यातील इटोली येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात साजरे....!


💥कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ मेनकुदळे हे होते💥 

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर 

आज दिनांक 31जानेवारी 2023 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा इटोली येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले .यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य ,बंजारा नृत्य, लोकगीत ,लावणी ,गोंधळ ,भारुड, पोवाडा , रिमिक्स इत्यादी नृत्यप्रकारात  जवळपास 25 गाण्यांवर सामूहिक व वैयक्तिक नृत्य सादर केले व उपस्थितांची मने जिंकून घेतली. शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना स्फूर्ती मिळावी. यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ मेनकुदळे हे होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी गणेश गांजरे साहेब ,माजी जि.प.समाजकल्याण सभापती रामराव उबाळे,इटोली गावचे सरपंच संगीताताई घुगे,उपसरपंच छायाताई मेनकुदळे हे होते. याप्रसंगी सर्व ग्रा.पं.सदस्य ,शा.व्य.समिती सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षण प्रेमी व पत्रकार उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्या नागरगोजे यांनी केले‌ व सूत्रसंचालन भास्कर चव्हाण, मीरा दाडगे यांनी तर आभार प्रदर्शन परमेश्वर मेनकुदळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक भास्कर जुमडे सहशिक्षक गजानन काळे, मंगेश मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या