🌟वारकऱ्याच्या मुलाच्या किडनी प्रत्यारोपणासाठी रोहिदास महाराजांनी जमवला २६ हजाराचा निधी....!


🌟मालेवाडीवाशीयांची दानशूरता,आणखी मदतीची गरज🌟


  
गंगाखेड (दि.२७ फेब्रुवारी) - पंढरपूरच्या पांडुरंगाची  वारी न चुकता करणाऱ्या पांडुरंग महाराज सदगे यांच्या मुलाच्या किडनी प्रत्यारोपणासाठी रामायणाचार्य ह भ प रोहिदास महाराज मस्के यांच्या आवाहानावरून मालेवाडीवासियांनी रविवारी दरलिंगेश्वर संस्थानातील कीर्तनाच्या कार्यक्रमात २६ हजाराचा निधी जमवत संबंधिताकडे सपूर्द केला. 


                                    पांडुरंग महाराज सदगे हटकरवाडी तालुका मानवत येथील रहिवासी आहेत .पिढ्यापासून सदगे कुटुंब हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे वारी न चुकता करतात. वारकरी संप्रदायात त्यांचे जिल्हाभर नाव आहे .पण मागील काही दिवसापासून मृदंग वादक असलेल्या त्यांचा मुलाची अचानक किडनी खराब झाली. यासाठी आजपर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. पांडुरंग महाराजांनी आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी घर ,शेती विकून टाकली. आजपर्यंत जमवलेली सर्व मायापुंजी लेकरासाठी दवाखान्यात खर्च केली. स्वतःची किडनीही दिली. पण ती फेल झाली. परत एकदा त्या मुलाचे किडनी प्रत्यारोपण करायचे असून त्यासाठी दहा लाखापर्यंत चा खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्रभर रामायणाचार्य म्हणून ख्याती असलेले ह भ प रामराव महाराज ढोक यांचे शिष्य ह भ प रोहिदास महाराज मस्के यांचे रविवारी मालेवाडी येथील दरलिंगेश्वर संस्थानात सप्ताहाच्या निमित्ताने कीर्तन सेवा संपन्न झाली. कीर्तनात म्हस्के महाराजांनी पांडुरंग महाराज सदगे यांच्या मुलाच्या दवाखान्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. मस्के महाराजांच्या आवाहनास उपस्थित भाविक भक्तांनी दाद देऊन मोठ्या प्रमाणात मदत केली. एकूण 26 हजाराची मदत हजारो भक्तांच्या उपस्थितीत पांडुरंग महाराज यांच्याकडे सपोर्ट करण्यात आली. सदगे परिवारासह आज पर्यंत पाच ते सहा वारकऱ्यांच्या दवाखान्याच्या खर्चासाठी लागणारे पैसे मिळवून देण्यासाठी  धावून आल्याबद्दल रोहिदास महाराज मस्के यांचे किर्तन स्थळी उपस्थित असलेले आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी जाहीर कार्यक्रमात आभार मानले. यासाठी ह भ प अनंत महाराज बर्वे, बालासाहेब बचाटे , नारायण महाराज मालेवाडीकर, राम महाराज कुकडे, महारुद्र महाराज बोबडे, परमेश्वर मुठाळ, भानुदास शिंदे,ओंकार महाराज बोबडे पडेगावकर आदीसह सर्व गावकऱ्यांनी या कामी पुढाकार घेतला होता. बाहेर गावावरून आलेल्या भक्तांनीही सढल हाताने मदत केली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या