🌟पुर्णा तालुक्यातील सुहागन येथील सभागृह लोकार्पण व गुणवंत विद्यार्थी सन्मान दहावीचे विद्यार्थी निरोप समारंभ संपन्न....!


🌟या सोहळ्यास खासदार संजय (बंडु) जाधव यांची प्रमुख उपस्थिती🌟

🌟स्पर्धात्मक धावपळीत आज संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हेच खरे आव्हान - खा संजय (बंडू) जाधव


पुर्णा (दि.२६ फेब्रुवारी) - सद्याचे युग हे अत्यंत स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येक व्यक्ती जीवाचे रान करतांना दिसतो. अशावेळी आजच्या एकंदरीत धावपळीत आणि बाहेरच्या प्रचंड कलुषित वातावरणात आदर्श अशा संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हेच शिक्षक, पालक यांच्यासाठी खरे आव्हान आहे, असे प्रतिपादन परभणीचे खासदार संजय जाधव यानी मौ.सुहागन ता.पुर्णा जि.परभणी येथील  भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत बांधकाम केलेल्या सभागृहाचा लोकार्पण सोहळा व छ.संभाजी विद्यालयातील गुणावंत विद्यार्थी सत्कार आणी इ.10 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभात प्रतिपादन केले तर या कार्यक्रमासाठी विशेष उपस्तीती म्हणून मुखेड येथील शाहीर अनाभाऊ साठे महाविद्यालयाचे प्राचार्य मनोहर तोटरे सर उपस्थिती होती.

मौ.सुहागन ता.पुर्णा जि.परभणी येथील शिक्षण क्षेत्रातील नामवंत शाळा छत्रपती संभाजी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी सत्कार आयोजित व इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ सोहळा प्रसंगी ते बोलत आसताना प्राचार्य डाँ. मनोहर तोटरे यानी विद्यार्थ्यांच्या आनेक पैलूवर प्रकाश टाकताना सवयी,मोबाईल न वापरणे.नैराश्य किवा आपयशाला न घाबरून जाता समर्थ पणे एक ध्येय ठेऊन आभ्यास करावा.शिक्षक व पालकांचा वेळोवेळी मार्गदर्शन घेत जावे व एक आदर्श विद्यार्थी म्हणून नांव कमवले तर गांवाचे नाव होऊन संपुर्ण देशातील विविध ठिकाणी अधिकारी म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते आसेही त्यांनी आपल्या मनोगतामध्ये मत व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात खासदार संजय (बंडु) जाधव व प्राचार्य तथा सरपंच मनोहर तोटरे यानी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले.खासदार संजय जाधव यानी आपल्या मनोगतामध्ये सुहागन गावाच्या विकासासाठी मि कट्टिबद्ध आसल्याचे सांगितले गावातील मंडळीने एक सभागृहाची मागणी केली होती मि ती पुर्ण करुणच लोकार्पन सोहळ्यासाठी आल्याचे मत व्यक्त केले व यापूढेही जे काही सार्वजनिक काम सांगितले जाईल ते पुर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न राहिल आसा शब्द यावेळी देऊन या विद्यालयातील संस्था अध्यक्ष .मुख्याध्यापक.शिक्षक यानी विद्यार्थी घडवून आनेक शासकीय.खाजगी ठिकाणी पाठवीत आहेत हे खुप महत्त्वाचे काम या विद्यालयाच्या माध्यमातून होत आहे आसेही ते याप्रसंगी बोलत होते.

                 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील जेष्ट नागरिक बळीरामजी भोसले हे  होते.तर शिवसेना ,(ठाकरे गटाचे )जिल्हाप्रमुख विशाल कदम.सहसंपर्कप्रमुख सुधाकर खराटे.पुर्णा सहकारी कारखाना सचालंक भगवानराव धस.तालुकाप्रमुख काशीनाथ काळबाडे.शहरप्रमुख दिलीप अंबोरे.माजी नगरसेवक श्यामराव कदम.कृ.उ.बाजार समीतीचे सभापती बालाजी देशाई.उपसभापती लक्ष्मणराव बोबडे.जिल्हा परिषद परभणी चे माजी शिक्षण सभापती गंगाप्रसादजी आणेराव.माजी नगरसेवक  तथा नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष एकलारे. शहर प्रमुख मुंजाजी कदम.पत्रकार सुनिल रामदासी.विश्वनाथआपा सोळंके माजी जि.प.सदस्य, बंडूआपा बनसोडे युवासेना तालुकाप्रमुख.बालाजी वैद्य. सुदामराव डोईफोडे,गोविद सोलव. उपतालुकप्रमुख, प्रा गोविंद कदम, माजी नगरसेवक बंटी कदम, दलित आघाडी शहर प्रमुख प्रक्षितदादा सवणेकर, विकास वैजवाडे,माणिकराव सूर्यवंशी, सरपंच संघटना तालुका अध्यक्ष गोविंदराव आवरगंड, सर्कल प्रमुख सुदामराव ढोणे,बालाजी पिसाळ ,संतराम मामा ढोणे,भुजंगराव बुचाले, बबन बुचाले,गणपतराव शिंदे .विशालराव भोसले युवा सेना उपजिल्हाप्रमुख परभणी,माणिकराव भालेराव.याची प्रमुख उपस्थिती होती.                            

 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले.विद्यालयातील मुख्याध्यापक मनोहर कल्याणकर.सटवाजी भोसले.ज्ञानदेव भोसले.आनंद बुचाले मनसे तालुका प्रमुख,माणिक भालेराव,सुभाष भोसले, दौलत भोसले सामना प्रतिनिधी पूर्णा, पुरभाजी भोसले, पांडुतात्या  भोसले , राजकुमार भोसल,सुनील भोसले, गंगाराम भोसले राघू भोसले अरुण वाघमारे  विजय भोसले, बालाजी वाघमारे, गोपाळ वाघमारे, बंडू वाघमारे, बालाजी भोसले,नामदेव भोसले, संदीप भोसले, यांच्यासह गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले.तर विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी यानी सुरेख नियोजन केले तर कार्यक्रमाचे सुत्रसचलन छ.संभाजी विद्यालयाचे अध्यक्ष हिराजी भोसले यानी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या