💥पिसीपीएनडीटी हेल्पलाईनवरील तक्रारीनुसार बोगस भोंदुबाबावर कारवाई : मंगरुळपीर येथील घटना....!


💥भोंदूबाबांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.विजय काळबांडे यांनी दिली💥

(फुलचंद भगत)

वाशिम : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याच्या कडक अंमलबजावणीसाठी ऑनलाईन तक्रार हेल्पलाईनवर प्राप्त झाली होती. त्यानुसार १२ फेब्रुवारी रोजी जिल्हा शल्य चिकीत्सक, डॉ. विजय काळबांडे यांच्या मार्गदर्शनात मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम येडशी येथील भोंदु बाबावर कारवाई करण्यासाठी मंगरुळपीर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्रीकांत जाधव, आयसीटीसी समुपदेशक रमेश आडे, सफाई कामगार प्रकाश संगत व मंगरुळपीर पोलीस स्टेशन येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष मनवर यांनी एका महिलेला बनावट केस म्हणुन सकाळी ११ वाजता त्या भोंदुबाबाकडे पाठविले. तेथे ती महिला गेल्यावर त्या बाबाने त्या महिलेला तुम्ही कशाला आले, तुम्हाला काय अडचण आहे असे म्हटल्यावर महिला कर्मचारी यांनी भोंदु बाबांना सांगितले की, मला पहिली एक मुलगी आहे त्यावर त्यांनी तुम्हाला किती महिन्याचे दिवस गेले आहे.

गरोदर आहात का असे विचारणा केली. महिला कर्मचारी यांनी त्यांना अडीच महिने झाले आहे असे सांगीतले. त्यानंतर तो भोंदूबाबा मंदिराच्या बाजुच्या रूममध्ये गेला. त्याने कपुरी नागिलीच्या पानामध्ये पानाच्या खालुन साखरेचे बत्ताशे अशाप्रकारचे औषध पानामध्ये देऊन हे औषध माझ्या समोरच खाण्यास सांगीतले. महिला कर्मचाऱ्याने औषध, पान व त्यात दिलेले बत्ताशे खाल्ले. त्या भोंदुबाबाने या औषधाने तुम्हाला मुलगा होईल, अशी खोटी बतावणी त्या महिलेला केली.

          त्यानंतर थोड्या अंतरावर असलेले सोबतचे डॉ. श्री. जाधव, व श्री. आडे, श्री. संगत व श्री. मनवर हे सर्वजण त्या भोंदुबाबा जवळ गेले. भोंदू बाबाने त्यांना त्यांचे नाव विचारले, त्यांनी त्यांचे नाव सांगीतले, त्यावर त्यांना घेतलेल्या औषधाने नक्कीच मुलगा होईल का असे विचारले असता, बाबानी सांगीतले की नक्कीच मुलगा होईल. त्यांनी खात्री पटवुन देऊन माझ्याकडे औषध घेण्यासाठी दुरदुरचे लोक येतात. जसे की, दिल्ली, सुरत येथुन माझ्याकडे मुलगा होण्यासाठी औषध घेण्यासाठी लोक येतात. ही औषधी घेतल्यामुळे मुलगा होतो म्हणुनच इतक्या दुरवरुन लोक माझ्याकडे औषधी घेण्यासाठी येतात. असे त्या बाबाने स्वतः कबुल करुन सांगितले.

         चमूने त्या भोंदूबाबाला विचारले असता तुम्ही औषधाचे काही पैसे घेता का, त्यावर त्याने माझ्याकडे गायी आहेत, त्याकरीता लोक ढेप आणून देतात असे सांगितले. तुम्ही ही औषधी देता याचे शिक्षण कोणाकडून घेतले असे विचारले असता त्याने सांगीतले की, माझे गुरु हनुमानदास महाराज यांच्याकडून मी हे शिक्षण घेतले आहे. त्या महाराजाचे सन २००७ मध्येच निधन झाले आहे. त्यानंतर २००७ पासुन हे औषध मी स्वतः देत आहे. यावेळी चमू व पंच मिळून भोंदुबाबाच्या रुममध्ये जाउन बघितले असता रूममध्ये पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये साखरेचे बत्तासे, नागीलीचे पाने, रद्दी पेपर व एका स्टिल डब्ब्यामध्ये चार छोटया प्लास्टीक बॉटल मिळाल्या. त्या बॉटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जडीबुटीची औषधी मिळाली. या औषधांचा पंचनामा करुन पंचासमक्ष जप्त करण्यात आले. भोंदूबाबांवर प्रथम खबर अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. विजय काळबांडे यांनी दिली.

प्रतिनीधी :- फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या