💥महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचा वाढदिवस जिंतूर येथे उत्साहाने साजरा....!


💥बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे ग्रामीण रुग्णालयातील रुग्नांना फळ वाटप💥


जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

महाराष्ट्रा राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरूवारी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात बाळासाहेबांची शिवसेना पक्षा  तर्फे रूग्णांना फळवाटप करण्यात आले.बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे युवा नेत्या सौ. अक्षताताई राजेश चक्कर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत  पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयातील  रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.


याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेनेचे बाळासाहेब चक्कर पाटील, अंकुशराव राठोड, लक्ष्मण महाराज, बापूराव चावरे,  गजानन गाडेकर, निलेश चव्हाण, राजाभाऊ वाकडे, शिवानंद पुरी, कार्तिक थिटे, योगेश राठोड, मारुती देशमुख, सोपान देशमुख, अमोल देवकर, यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या