🌟युवतींनो परिस्थितीचा बाऊ न करता,संयम आणि संघर्षातून जगाला जिंका - डॉ. ज्ञानेश्वर भाले


🌟स्पर्धेच्या युगात कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय विद्यार्थीनींना सन्मानानं यशस्वी करणार🌟

विद्यार्थीनींनो,तुम्ही भाग्यवान आहात.तुम्हाला शतकोत्तराची परंपरा लाभलेल्या चांगल्या शिक्षण संस्थेत शिक्षण्याची संधी मिळाली.स्ञीयांना जीवनात पुरुषांपेक्षा अधिक संघर्ष करावा लागतो. सयंम आणि समन्वय साधत तुम्ही या जगण्याशी समरस होत आहात. आज कौशल्याधिष्ठीत गुणात्म शिक्षण तुम्हाला मिळत आहे. 

स्पर्धेच्या युगात कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय विद्यार्थीनींना सन्मानानं यशस्वी करणार ,असा विश्वास व्यक्त करत  महाविद्यालया कडून दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून विद्यार्थीनींनी प्रामाणिक परिश्रमातून अभ्यास आत्मसात करत आत्मनिर्भर बनावे असे आवाहन दै.लोकमत परभणी चे जिल्हा प्रतिनिधी डॉ.ज्ञानेश्वर भाले यांनी केले.

    नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे,कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी सांस्कृतिक विभाग आयोजित कमलोत्सवाच्या समारोप आणि बक्षिस वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून डॉ.ज्ञानेश्वर भाले बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.किरणराव सुभेदार यांची उपस्थिती होती.प्रमुख अतिथी नेहरु युवा केंद्र परभणी चे सन्मवयक शशांक रावला,संस्थेचे सदस्य शंतनूभैय्या सुभेदार उपस्थित होते.प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले, उपप्राचार्य डॉ संगीता आवचार,प्रा.डॉ.रविंद्र इंगळे,प्रा.संतोष कीर्तनकार उपस्थित होते.

      कै.सौ.कमलताई जामकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.प्राचार्य डॉ वसंतराव भोसले यांनी मान्यवरांचे स्वागत केले.ॲड किरणराव सुभेदार यांच्या हस्ते अतिथी डॉ.ज्ञानेश्वर भाले,आणि शशांक रावला यांचा सत्कार करण्यात आला.महाविद्यालय गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

            युवतींनी खुल्या मनानं एक उत्तम स्पर्धक म्हणून स्वतःला सिध्द करत अव्दितीय यश संपादन करावे. स्पर्धेसह सातत्यपूर्ण सरावातून खेळ खेळत खेळीमेळीच्या वातावरणात हारजीत स्विकारल्यास तुमच्यातील खिलाडूवृत्ती इतरांना आनंद देत प्रेरणा देण्याचे कार्य करेल असा विश्वास शशांक रावला यांनी व्यक्त केला.

           स्वतःला कमी न समजता दुसऱ्याला ही कमी न लेखता समान संधी तत्वाचा अवलंब करित लोकजीवनात स्वआचरणातून प्रवाही व्हा.तुम्ही संस्थेचा,महाविद्यालयाचा  चेहरा आहात. विधायक कार्यातून मेहनतीच्या बळावर समाजोपयोगी कार्य करत महाविद्यालयाच्या गौरवशाली परंपरेत भर घालावी असा आशावाद शंतनू सुभेदार यांनी व्यक्त केला.

          युवतींनी अशा स्नेहसंमेलनातून कलागुणांची उधळण करीत आपल्यातील न्यूनगंड नाकारत सिध्द व्हावे.हेवेदावे,रागलोभ विसरत उदार मनानं उदात्त हेतूने स्पर्धेत सहभागी होत आनंदाची अनुभूती आणि समाधानाची प्रचिती देत लोकरंजनाचे महान कार्य करावे असे प्रतिपादन अध्यक्षिय समारोपात ॲड.किरणराव सुभेदार यांनी केले.

प्रसंगी कमलोत्सवात नेहरु युवा केंद्र परभणी, वाड्मय विभाग आयोजित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.खेल मंञालय आणि नेहरु युवा केद्र परभणी ,सौ.अनिता सामाले यांचे साज बुटीक,मनिषा चव्हाण यांचे न्यू लूक ब्युटीसीएन यांनी प्रायोजकत्व स्विकारत पारितोषिके देत योगदान दिले.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.पल्लवी कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रा डॉ संगीता लोमटे यांनी मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या