💥परभणी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र प्राणी पक्षांसह जनावरांसाठी पाणवठे तयार करण्याची मागणी....!


💥विर वारकरी सेवा संघाची जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्फत केंद्र व राज्य कृषी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी💥 

परभणी (दि.०८ फेब्रुवारी) - उन्हाळ्याचे दिवस सुरु होत असल्यामुळे प्रशासनाने परभणी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र प्राणी पक्षांसह जनावरांसाठी पाणवठे अर्थात पाण्याचे हौद बांधून जनावरांसह पक्षी प्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी विर वारकरी सेवा संघाच्या वतीने प्राणीसेवक नितीन जाधव गोगलगावकर प्राणी- गोमाता संरक्षण जागृती अभियान परभणी यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्फत केंद्रासह राज्याचे कृषी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


विर वारकरी सेवा संघाच्या वतीने प्राणीसेवक नितीन जाधव गोगलगावकर प्राणी- गोमाता संरक्षण जागृती अभियान परभणी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की परभणी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र लहान मोठे छोटे प्राणी पक्षी व जनावरे आहेत त्यामुळे कडक उन्हाळ्यात त्यांना पिण्यासाठी सर्वत्र पाण्याची व्यवस्था व्हावी याकरिता प्रशासनाने प्रशासकीय पातळीवर मोहीम राबवून प्रत्येक चौकात किंवा मंदिरांच्या परिसरांसह शेत शिवारांसह मोकळ्या जागेमध्ये पाण्याची व्यवस्था करावी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केद्र व राज्याच्या कृषी मंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या निवेदना प्राणी मित्र नितीन जाधव गोगलगावकर यांची स्वाक्षरी आहे....... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या