💥राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाळासाहेबांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची मुहूर्तमेढ..!


💥बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते भास्करराव लंगोटे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन💥


परभणी (दि.10 फेब्रुवारी) :  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच शिंदे यांच्या जनसेवा आणि रुग्णसेवेचा वारसा पुढे जावा या दृष्टीकोनातून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महानगर जिल्हाप्रमुख तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य प्रवीण देशमुख यांनी सुरु केलेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षास गुरुवार दि.09 फेब्रुवारी 2023 रोजी प्रारंभ झाला.

              बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते भास्करराव लंगोटे यांच्याहस्ते वसमत रस्त्यावरील महानगर जिल्हा शाखेच्या कार्यालयालगत या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक संदीप पांगरकर, उपजिल्हाप्रमुख केशव कदम, माजी नगरसेवक शब्बीर अन्सारी, विश्‍वासराव कर्‍हाळे, विजय गायकवाड, सोमनाथ हट्टेकर, केशव कंकाळ यांच्यासह अन्य उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पहिल्या-वहिल्या मोफत रुग्णवाहिकेच्या सेवेकरीता संकट चतुर्थीच्या मुहूर्तावर रुग्णवाहिका बुक करण्यात आली, अशी माहिती महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी दिली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या