💥पुर्णा शहरातील परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासनाचा मनमानी कारभार...!


💥ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह निराधार/वयोवृध्द/अपंगांना वेठीस धरत हितसंबंधातील लोकांना प्राधान्य💥

पुर्णा (दि.२० फेब्रुवारी) - पुर्णा शहरातील कै.राजाभाऊ बरदाळे भाजी मार्केट लगत असलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शहर शाखा प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे ग्रामीण भागातील शेतकरी सर्वसामान्य नागरिक ग्राहाकांसह वयोवृध्द निराधार अपंग अक्षरशः त्रस्त झाल्याचे निदर्शनास येत असून संबंधित बँक प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी आपले हितसंबंध जोपासत कर्तव्य बजावत असल्यामुळे संजय गांधी निराधार योजनांसह विविध शासकीय योजनाचे लाभलारक वयोवृध्द अपंग महिलांना अक्षरशः दिवसभर लाईनीत बँके समोरील अरुंद अश्या भर रस्त्यावर उभे करुन हितसंबंधाती लोकांना प्रथम प्राधान्य दिले जात असून त्यांच्यासह ग्रामीण भागातील विमा योजनेतील लाभधारक तसेच दुष्काळग्रस्त अनुदानाचे लाभधारक शेतकऱ्यांना दिवसभर वेठीस धरीत हिंतसंबंधाती लोकांना बँकेचे मुख्यद्वार बंद करुन बाजूच्या दाराने बँकेत बोलावून त्यांची कामे केली जात असल्यामुळे परिसरात अक्षरशः गदारोळ माजत असल्यामूळे परिसरातील दुकानदार व्यापारी त्रस्त झाले आहेत.


परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य द्वार बंद करुन हित संबंध जोपासत शेतकऱ्याला दुष्काळाची रक्कम दिली जात असल्याने शेतकऱ्यांना आपली शेतातील महत्वाची काम सोडून बँकेत चक्करा माराव्या लागत असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वैतागून गेल्याचे पाहावयास मिळत आहे  ग्रामीण भागातील शेतकरी हे दुष्काळाची रक्कम घेण्यासाठी बँकेत जातात तेव्हा बँकेतील अधिकारी/कर्मचारी त्यांना बँके बाहेर हाकलून बँकेचे शटर बंद करून घेत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जमा झालेले शेतकरी खातेदार यांच्या विविध शासकीय योजनांतील लाभधारक वृध्द अपंग महिला रस्त्यावर ठाण माडून बसत असल्यामुळे रहदारीसस वाहतुकीस देखील अडथळा निर्माण होत आहे

ग्रामीण भागातील शेतकरी हे सकाळी ०८-०० वाजेपासूनच बँकेच्या समोर रस्यावर रांगा लावून उभे राहत आहे तर वृध्द महिला अपंग रस्त्याच्या आसपास ठाण मांडून बसतात मात्र यानंतर बँक उघडताच बँकेतील अधिकारी/कर्मचारी विड्रॉल संपले,कॅश संपली असे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सांगून त्यांची सातत्याने फिरवाफीरवी करीत त्यांना त्रास्त करुन सोडतांना देखील पाहावयास मिळत आहे.

पूर्णा शहरात सोमवारी भाजीपाल्याचा तर शनिवारी जनावरांचा  बाजार भरतो त्यामुळे बाजाराच्या दिवशी ग्रामीण भागातील शेतकरी हे आपली रक्कम घेण्यासाठी व बाजारासाठी आलेली असताना त्यांना दुसऱ्या दिवशी या रक्कम संपली विड्रॉल संपले असे स्पष्ट सांगून त्यांना हाकलून लावण्याचे काम सध्या शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शहर शाखेत होतांना पाहावयास मिळून येत आहे. या गंभीर प्रकाराकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांना तात्काळ लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे..... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या