💥उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले देवी जगदंबा,संत सेवालाल महाराज व संत रामराव महाराजांच्या समाधीचे दर्शन.....!


💥यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री संजय राठोड,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांची उपस्थिती💥 


वाशीम (फुलचंद भगत) - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुख्यमंत्र्यांसमवेत हेलिकॉप्टरने पोहरादेवी येथे आगमन झाल्यावर त्यांनी माता जगदंबा देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.तसेच संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री संजय राठोड,ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन,बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे,आमदार राजेंद्र पाटणी, आमदार ऍड.निलय नाईक,बंजारा समाजाचे धर्मगुरु महंत बाबूसिंग महाराज,महंत कबिरदास महाराज, शेखर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या