💥परभणी येथील हजरत सय्यद शाह तुराबूल हक दर्गाच्या कमानीवर अखेर विद्युत रोषणाई नटली....!


💥मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या मागणीस यश💥

परभणी (दि.०५ फेब्रुवारी) : परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीय एकात्मतेच प्रताक मानल्या जाणाऱ्या हजरत सय्यद शाह तुराबूल हक यांचा 116 व्या उर्स शरीफ महोत्सवास दिनांक 1 फेब्रुवारी पासून सुरवात झाली.


     हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क रहें यांच्या उर्स निमीत्त शहरातील जांब नाका येथील कमानीची विद्युत रोषणाई व सफाई महापालिकेच्या वतीने उर्स सुरू होण्यापूर्वी केली जात असे परंतु यावेळी मनपाने काही कारणास्तव जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद रफिक पेडगावकर यांनी एका निवेदनाद्वारे केली होती यावेळी वक्फ बोर्डाने उर्सात वेगवेगळ्या टेंडर प्रक्रियेतून कोट्यावधी रुपयांचा उत्पन्न निधी प्राप्त झाला दुसरीकडे वक्फ बोर्डाने उर्स निमित्त विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करुन नियोजनासाठी निधी उपलब्ध करून दिले मात्र महत्वाच्या जांब नाका येथील भव्य प्रवेशद्वार कमानी ची विद्युत रोषणाई न केल्यामुळे भाविकांकडून एकच नाराजी व्यक्त केली जात असल्याचे दिसून आले रोषणाईची उपयोजना कोण करणार मनपा की वक्फ बोर्ड हे गुलदस्त्यात दिसत होते परंतु आज दिनांक 03 फेब्रुवारी रोजी हजरत सय्यद शहा तूराबूल हक उर्सानिमित्त जांब नाका येथील प्रवेशद्वार कमानीची रोषणाई साठी जिल्हा प्रशासनाने उशिरा का होईना एमडिओ संघटनेच्या तक्रारची दखल घेत कमानीवर प्रशासनाने विद्युत रोषणाई करण्यासाठी संबंधितांना कळवून कारवाई सुरू करण्यात आली तुराबुल हक्क दर्गा च्या कमानीवर विद्युत रोषणाई नटल्याबद्दल भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या