💥पुर्णेत सार्वजनिक शिवजयंती महोत्सव होणार धुमधडाक्यात साजरा...!


💥शिवजयंती महोत्सवा निमित्त शहरात धार्मिक/सामाजिक उपक्रमांसह भव्य जयंती मिरवणूकीचे देखील आयोजन💥 


पुर्णा (दि.१६ फेब्रुवारी) - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयती दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती पुर्णाच्या वतीने यावर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात येणार असून शहरात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने 'शिवजन्मोत्सवा निमित्त' दि.१८ फेब्रुवारी २०२३ रोजी सायं.०९-०० ते ११-०० वाजेच्या सुमारास शहरातील महादेव मंदिर संस्थान येथे शिवचरित्रकार हभप.दिपालीताई खिळे (कानडीकर) बिड यांच्या भव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले असून यानंतर रात्री ११-०० वाजेच्या सुमारास याच ठिकाणी 'शिवजन्मोत्सव पाळणा' या कार्यक्रमाचे तर दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०-०० वाजेच्या सुमारास शिवजन्मोत्सवा निमित्त महादेव मंदिर देवस्थान येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची ढोल ताश्यांसह टाळ मृदंगाच्या गजरात भव्य मिरवणूक निघणार आहे.


यानंतर रात्री १०-०० वाजेच्या सुमारास शहरातील शिवतीर्थावर महा शिवआरती नंतर शिवजन्मोत्सवाची सांगता होणार आहे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने नियोजित कार्यक्रमा अंतर्गत १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळच्या सुमारास आयोजित मोटार सायकल रेली काही कारणास्तव रद्द करण्यात आली असल्याचे ही सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने जाहिर करण्यात आले असून या 'शिवजन्मोत्सवात' तमाम शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे कार्यकारी अध्यक्ष उत्तम उर्फ बंडू ज्ञानोबा कदम,अध्यक्ष रामेश्वर मंचकराव कदम,उपाध्यक्ष किरण गिरी कदम,सचिव पवन भगवानराव कदम,सहसचिव वैजनाथ उत्तमराव जगाडे,कोषाध्यक्ष संदिप बबनराव कदम यांनी केले आहे.....    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या