💥परभणी जिल्ह्यात शिवजयंती निमित्त रविवार दि.१९ फेब्रुवारी रोजी मद्यविक्रीची सर्व दुकान राहणार बंद....!


💥मद्यविक्रीची सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी आज दिले आहेत💥

परभणी (दि.१७ फेब्रुवारी) : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शिवजयंतीनिमित्त रविवार दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी मद्यविक्रीची सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी आज दिले आहेत. 

जिल्ह्यात रविवारी १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून, त्यानुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम  १४२ (१) अन्वये सर्व मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती १९ फेब्रुवारी रोजी मद्य विक्रीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी दिले आहेत....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या