💥परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या बालवैज्ञानिकांना शुभेच्छा....!


💥तामिळनाडूच्या पट्टीपुलमकडे परभणीचे १२ बालवैज्ञानिक रवाना : पिको सॅटेलाईट व पुन्हा वापरता येणारे रॉकेट सोडणार💥

परभणी (दि.१४ फेब्रुवारी) : माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनँशनल फाउंडेशन (रामेश्वरम) स्पेस झोन इंडिया व मार्टिन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेतून निवड झालेले परभणीचे १२ बालवैज्ञानिक पात्र ठरले असून, ते चेन्नई एक्सप्रेसने पट्टीपुलमकडे रवाना झाले. या बालवैज्ञानिकांना जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी शुभेच्छा दिल्या.  

            निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, फाउंडेशनचे जनरल सेक्रेटरी मिलिंद चौधरी, राज्य समन्वयिका मनीषा चौधरी, राजकुमार भांबरे, जिल्हा समन्वयक मेघशाम पत्की आणि बालवैज्ञानिकांचे पालक यावेळी उपसि्थत होते कल्पेश मेघश्याम पत्की, यश संजय भांबरे, आदित्य व अक्षद चौधरी, पद्मनाभ कुलथे, अनन्या कुलथे, सात्विक आगरकर, विकास बाळू मुळे, यज्ञेश संजय भांबरे, अद्वत मोरे, कृष्णा मगवनी, निखिल कुलकर्णी या बालवैज्ञानिकांचा सहभाग आहे.

बालवैज्ञानिकांच्या निवडीसाठी नुकतीच नागपूर, पुणे आणि परभणी येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पट्टीपुलम येथून १९ फेब्रुवारी रोजी एकाचवेळी १५० उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार असून, यात परभणीतील बालवैज्ञानिकांच्या उपग्रहांचा समावेश राहणार आहे. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हाऊस ऑफ कलाम, स्पेस झोन इंडिया, मार्टीन ग्रुप यांच्या वतीने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल मिशन २०२३ आयोजित केले आहे.

या कार्यशाळेत सहभागी झालेले १०० विद्यार्थी चेन्नई येथे रॉकेट बनवणार आहेत. डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, रामेश्वरम् या संस्थेमार्फत हा उपक्रम देशात राबवला जात आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी पाच हजार मुला-मुलींची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत प्रथम येणारे शंभर विद्यार्थी चेन्नई येथे रॉकेट निर्मितीच्या प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहेत.

 यावेळी नीरज  धामणगावे, अश्विनी मोरे दस्तापुरकर व पालक उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या