🌟शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी मा.आ.विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वात एकदिवशीय धरणे आंदोलन संपन्न.....!

 


🌟शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करून तात्काळ वाटप करण्याची मागणी🌟

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर :- जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यामध्ये अतिवृष्टी अनुदान मंजूर करणे, सर्व शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर करणे, शेतमालाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरु करणे व सक्तीची वीज तोडणी थांबविणे, कापसास बारा हजार रु. तर सोयाबीन साठी आठ हजार रुपये हमी भाव देणे अशा विविध मागण्यासाठी मा.आ.विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे आज रोजी तहसील कार्यालय जिंतूर या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन संपन्न झाले. 


जिंतूर तालुक्यात मागील वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर -२०२२ या महिन्यात सततचा पाऊस व अतिवृष्टी झाल्यामुळे जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठवला होता. या सर्व शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत करणे आवश्यक होते. परंतु, तसे न होता राज्य शासनाने अतिवृष्टी बाधित गटातून जिंतूर तालुका वगळला आहे. तरी शासनाने जिंतूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करून तात्काळ वाटप करावी.

तसेच जिंतूर तालुक्यातील १,१३,७८०  शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे, त्यामध्ये शेतकरी हिस्सा , राज्य शासन हिस्सा व केंद्र शासन हिस्सा असे संयुक्तिक ४१,९४,७८,७५६ /- एवढी रक्कम विमा कंपनीला अदा करण्यात आलेली आहे. त्यामध्ये विमा कंपनीने ३१४,६०,१३,४४८/- एवढ्या रक्कमेच्या नुकसान भरपाईची हमी घेतलेली आहे.  त्यापैकी केवळ ७० हजार शेतकऱ्यांनाच १८,६४,५०,१९५/- रु एवढाच पिक विमा मिळाला आहे किंवा मिळणार आहे. तालुक्यातील ईतर विमा धारक शेतकऱ्यांचे नुकसान पाहता सर्व शेतकऱ्यांना विमा मिळणे आपेक्षित आहे, त्यामुळे राज्य शासनाने वरील बाबीचा गांभीर्यपूर्वक विचार करून संबंधित पीकविमा कंपनीला जिंतूर तालुक्यातील सर्व विमा धारक शेतकऱ्यांना विमा देण्यासाठी आदेशित करावे.


   सध्या रब्बी हंगाम चालू असून शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात येत आहे, त्यात मुगाची खरेदी हमीभावापेक्षा कमी दराने झाली असून हरभरा देखील शासनाकडून जाहीर झालेल्या हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी ‘हमीभाव खरेदी केंद्र’   तात्काळ सुरु करण्यासाठी संबंधितास आदेशित देण्यात यावेत. तसेच शेतकऱ्यांच्या कापसाला १२ हजार रुपये हमी भाव व सोयाबिनीला ८ हजार रुपये हमी भाव देण्यात यावा.


जिंतूर तालुक्यात बऱ्याच गावांमध्ये घरगुती व शेतीपंपाची महावितरणकडून सक्तीची वीजबिल वसुली करण्यात येत असून बिल न भरल्यास नागरिकांना व शेतकऱ्यांना पूर्व सूचना न देता वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. शेतकरी अगोदरच आस्मानी संकटात त्रस्त असल्यामुळे राज्यशासनाकडून सक्तीची वीजबिल वसुली थांबविणे आवश्यक आहे. तसे न होता वीजतोडणी सारख्या सुलतानी निर्णयामुळे शेतकरी हवालदील झालेला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना वीज तोडणी तात्काळ बंद करण्यासाठी आदेशित करावे. इ.मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व जिंतूर तालुक्यातील शेतकरी यांच्याकडून भव्य एकदिवशीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.


यावेळी प्रसादराव बुधवंत,अजयभैय्या चौधरी, विश्वनाथ राठोड, बाळासाहेब घुगे, मुरलीधर मते, अभिनय राऊत, गणेशराव इलग, बाळासाहेब भांबळे, विजय खिस्ते, शरदराव मस्के, मनोज थिटे, मनीषाताई केंद्रे, मनोहर डोईफोडे,  चंद्रकांत बाहीरट, संजय(बंटी) निकाळजे, सोहेल सर, उस्मान पठाण, आहेमद बागबान, मधुकर भवाळे, खयुम कादरी, बी.जी.चव्हाण, मधुकर देशमुख वस्सा,  शौकत लाला,आक्कु लाला प्रवीण चव्हाण, सलीम काझी,  यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या