💥पुर्णा नगर परिषद प्रशासनाने चालवलाय नागरिकांच्या जिवाशी खेळ : प्रशासकीय इमारती समोरील खड्डा बुजवायला नाही वेळ...!


💥अकार्यक्षम मुख्याधिकाऱ्यां मुळे कुणाचा कुणालाच नाही मेळ ?💥


पुर्णा (दि.०१ फेब्रुवारी) - पुर्णा नगर परिषद प्रशासनाला शहरातील रस्ते/नाल्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाल्यानंतर देखील शहरातील मुख्य रस्त्यांसह शहरातील विविध भागांतील रस्त्यांची अक्षरशः दुर्दैवी झाली असून त्याही पेक्षा अत्यंत लज्जास्पद बाब म्हणजे पुर्णा नगर परिषद प्रशासनाने कोट्यावधी रुपयांच्या विकास निधीतून नगर परिषद प्रशासनाची अत्यंत सुसज्ज अशी इमारत तर उभारली परंतु या प्रशासकीय इमारती समोरील रस्ताची अवस्था मात्र एखाद्या पांदन रस्त्या सारखी झाल्याचे निदर्शनास येत असून त्यातही नगर परिषद प्रशासनाने इमारती समोरील रस्त्यावर ऐन मध्यभागी मोठ्ठा खड्डा केल्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून हा खड्डा बुजवण्याची देखील जवाबदारी पार न पाडल्यामुळे सदरील खड्डा नागरिकांसाठी जिवघेणा ठरत असून आज बुधवार दि.०१ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ०३-४० ते ०४-०० वाजेच्या सुमारास याचा प्रत्यय आला.


पुर्णा नगर परिषद समोरील मार्गावरून जाणारी एम.एच.२२ एस ३६९ ही कार नगर परिषद प्रशासनाने मागील तिन/चार महिण्यापासून खोदून ठेवलेल्या या खड्ड्यात अडकल्यामुळे या कारचा अपघात झाला सुदैवाने कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नसली तरी या खड्ड्यात अडकलेल्या कारला बाहेर काढण्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली त्यामुळे नगर परिषदेच्या गलथान व नालायक कारभार आज प्रत्यय पाहावयास मिळाला या प्रकरणावरून असे म्हणने यत्किंचितही चुकीचे ठरणार नाही...नगर परिषद प्रशासनाने चालवलाय अक्षरशः नागरिकांच्या जिवाशी खेळ....नगर परिषद प्रशासकीय इमारती समोरील जिवघेणा खड्डा बुजवायला देखील नाही वेळ ? मुख्याधिकारी अकार्यक्षम त्यामुळे कुणाला कुणालाच नाही मेळ.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या