💥जंग-ए-अजित न्युज : दि.3 फेब्रुवारी दिन विशेष - महत्वाच्या घटना/ऐतिहासिक घडामोडी....!


💥3 फेब्रुवारी 1928: सायमन गो बॅक या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला💥

✍️ मोहन चौकेकर 

3 फेब्रुवारी 1783: स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.

3 फेब्रुवारी 1870: अमेरिकेच्या संविधानातील १५ वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.

3 फेब्रुवारी 1925: भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.

3 फेब्रुवारी 1928: सायमन गो बॅक या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला

3 फेब्रुवारी 1966: सोव्हिएत रशियाने लूना-९ हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.

जन्म (3 FEBRUARY)

3 फेब्रुवारी 1821: वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १९१०)

3 फेब्रुवारी 1830: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट आर्थर टॅलबोट यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९०३)

3 फेब्रुवारी 1887: स्पेनचे पंतप्रधान हुआन नेग्रिन यांचा जन्म.

3 फेब्रुवारी 1900: रसायनशास्त्रज्ञ तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १९७५)

3 फेब्रुवारी 1963: भारतीय अर्थतज्ञ रघुराम राजन यांचा जन्म.

मृत्यू (3 FEBRUARY)

3 फेब्रुवारी 1468: जर्मन प्रकाशक, स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक योहान्स गटेनबर्ग यांचे निधन.

3 फेब्रुवारी 1832: पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली. (जन्म: ७ सप्टेंबर १७९१)

3 फेब्रुवारी 1924: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १८५६)

3 फेब्रुवारी 1969: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांचे निधन ( जन्म:१५ सप्टेंबर १९०९ )

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या