💥श्री.संत गजानन महाराज 145 वा प्रगटदिन जिंतूर मध्ये मोठ्या उत्साहात....!


💥प्रगट दिवसा निमित्त आचार्य महेश महाराज यांच्या मार्गर्शनाखाली श्री हभप.माऊली महाराज मुडेकर यांचे कीर्तन संपन्न💥

जिंतूर  प्रतिनीधी /  बि.डी.रामपूरकर

जिंतूर : शहरातील नगरेश्वर मंदिर व गुरुकुल आश्रम,येथील श्री संत गजानन महाराज मंदिर येथे 145 वा प्रगट दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.                        

  प्रगट दिवसा निमित्त आचार्य महेश महाराज यांच्या मार्गर्शनाखाली श्री ह.भ.प.माऊली महाराज मुडेकर यांचे कीर्तन ठेवण्यात आले. आणि गण गण गणात बोते म्हणत पुष्प उधळत प्रगट दिवस साजरा करण्यात आला. शहरातून पालखी काढून गुरुकुल मंदिर येथे आणली. त्या वेळी महराजाचे के.डी. वटाने यांनी  ह.भ.प.माऊली महाराज मुडेकर, आचार्य महेश महाराज,यांनी त्यांचे स्वागत केले. उपस्थित प्रमोद कराड, प्रताप देशमुख, तुकाराम अंभोरे, सह मोठ्या संख्यने महिला, पुरुष व वारकरी  उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या