💥14 फेब्रुवारी - काळा दिवस : दहशतवाद्यांनी केलेल्या जम्मू-काश्मींर मधील पुलवामा हल्ल्याला झाली तीन वर्षे पुर्ण.....!


💥या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ४० जवान झाले होते शहीद💥 

✍️ मोहन चौकेकर 

जम्मू-काश्मींरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज तीन वर्ष झाली. या हल्ल्या मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले होते. आज या शहीद जवानांना देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे.


बारामुल्ला जिल्ह्यातील अवंतीपुरा जवळील लाटूमोड येथे झालेल्या या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले होते. सुमारे ३५० किलो स्फोटकांनी भरलेले वाहन ताफ्यावर धडकावून दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्या नंतरचा हा सर्वांत मोठा हल्ला होता.

जम्मू-श्रीनगर हमरस्त्यावर हा भयानक हल्ला झाला. रजा संपवून कर्तव्यावर परतत असलेल्या जवानांसह ७८ वाहनांमधून सुमारे २५०० जणांचा ताफा काश्मीर खोऱ्याकडे निघाला असताना, हा प्रकार घडला. हल्ला झालेले ठिकाण श्रीनगर पासून ३० किलोमीटरवर आहे. स्फोटाच्या दणक्याममुळे जवानांच्या बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि अन्य अनेक बसचे नुकसान झाले होते.

स्फोटानंतर दहशतवाद्यांनी ताफ्यावर गोळीबारही केला होता. सीआरपीएफ चा ताफा जम्मूहून  त्यादिवशी दुपारी साडेतीन वाजता निघाला होता आणि सूर्यास्तापर्यंत तो श्रीनगर मध्ये पोहोचणे अपेक्षित होते. खराब हवामान व अन्य प्रशासकीय कारणांमुळे जम्मू-श्रीनगर हमरस्ता  दोन दिवस बंद होता. त्यामुळे निघालेल्या ताफ्यातील जवानांची संख्या जास्त होती.

नेहमी एका ताफ्यातून सुमारे एक हजार जवान जाता होते; पण दोन दिवस हमरस्ता बंद असल्यामुळे निघालेल्या ताफ्यात २५४७ जवान होते. ताफ्याच्या पुढे रस्ता सुरक्षित असल्याची खात्री करणारे, तसेच चिलखती वाहनही होते. हल्ल्यात हुतात्मा झालेल्या बस मधील जवान सीआरपीएफ च्या ७६ व्या बटालियनचे होते....

✍️ मोहन चौकेकर 

विर जवान तुम अमर रहो  💐💐💐💐

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या