💥परभणी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये फिरते लोकन्यायालय : शिबिराचे 10 फेब्रुवारीला उद्घाटन...!


💥नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.जी.लांडगे यांनी केले💥

परभणी (दि.06 फेब्रुवारी) : नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये  10 ते 28 फेब्रुवारीदरम्यान फिरते लोकन्यायालय व विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.जी.लांडगे यांनी केले आहे. 

या फिरते लोकन्यायालय व शिबिराचे येत्या शुक्रवारी (दि.10) सकाळी 10.30 वाजता परभणीतील जिल्हा न्यायालय परिसरात उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रारंभी हिंगोली जिल्ह्यात (दि. 13 ते 17) आयोजन करण्यात आले असून, परभणी जिल्या नत 17 ते 28 फेब्रुवारीदरम्यान शिबीर राहणार आहे. जिंतूर तालुक्यातील (दि.17 ते 18) शेवडी, सावंगी आणि बामणी, सेलू तालुक्यातील (दि.18 ते 20) म्हाळसापूर, कुंडी, गुगळी धामणगाव, मानवत तालुक्यातील (दि.20 ते 21) रुढी, इरळद, मानवत रोड, पाथरी तालुक्यातील (दि.21 ते 22) पोहेटाकळी, शिमूरगव्हाण, ढालेगाव, सोनपेठ तालुक्यातील (दि.22 ते 23) खपटपिंपरी, निमगाव, धामोनी, गंगाखेड तालुक्यातील (दि.23 ते 24) खंडाळी, बोथी, इसाद, पालम तालुक्यातील (दि.24 ते 25) डिग्रस, गुळखंड, फरकंडा, पुर्णा तालुक्यातील (दि.27) पिंपळगाव भाटे, चुडावा आणि परभणी तालुक्यातील गावांसाठी 28 फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायालय परिसरात फिरते लोकन्यायालय आणि शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या