💥मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर जबरीने चोरी करणाऱ्या 06 आरोपींना पोलीसांनी 24 तासाच्या आत अटक...!


💥सदरील गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि संजय गळवे करीत आहेत💥

मुंबई-पुणे एक्सप्रेस वाहिनीवर पनवेल जि.रायगड येथे दि.26 जानेवारी 2023 रोजी  मध्यरात्री 02.30 वा सुमारास 06 अनोळखी इसमानी फिर्यादी यांचेकडून 2,17,000/- रुपयें किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरी केला, अशा आशयाची तक्रार प्राप्त झाल्याने पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे C.R.No.29/2023 कलम 395 भा.द.वि.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मा.पोलीस आयुक्त सर, नवी मुंबई, मा. पोलीस सह आयुक्त सर, मा. अपर पोलीस आयुक्त सर (गुन्हे),   मा. पोलीस उप आयुक्त सर (परीमंडळ-२) व मा.सहा.पोलीस आयुक्त सर पनवेल विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरिक्षक संजय गळवे, सपोनि पाळदे, पो.उप.नि आकाश पवार व पोलीस स्टाफ अशी वेगवेगळी पथक  तयार करण्यात आली.

    गुन्हे प्रकटीकरण पथकाचे  सपोनि संजय गळवे व DB पथक यांनी फिर्यादी याचे प्रवासादरम्यानचे सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले. फिर्यादी याचे  वाहनाच्या पुढे मागे  जाणा-या सर्व सफेद रंगाच्या ईर्टिका गाडीचे रजि. क्रमांक प्राप्त केले व वेळेचे अचूक गणित जुळवून तसेच टोल नाक्यावरून FastTag स्कॅन च्या मदतीने  नमुद मोटार कारचा रजि. क्रमांक प्राप्त केला. तसेच FastTag धारकाचा  मोबाईल क्रमांक प्राप्त केला. तपासादरम्यान मोटर कार ही साताराच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. मो. वाहन हे खेड शिवापुर टोल नाका पास केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या कमतरतेच्या अभावी दिसेनासे झाले. मो. वाहन परत येईल असा अंदाज पकडून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या आम्ही सतत संपर्कात राहून मो. वाहन परत मुंबईच्या दिशेने टोल नाक्यावरुन पास झाल्यास आम्हास माहिती देन्याच्या सूचना दिल्या. गुन्ह्यात वापरलेली ईर्टिका गाडी दि.२८/०१/२०२३ रोजी पुन्हा खालापूर  टोल नाक्यावरून मुंबईकडे  पास झाल्याची माहिती मिळाली.  समांतर वेळी  मो. वाहन मालकास त्वरित ताब्यात घेऊन सपोनि संजय गळवे, सपोनि अविनाश पालदे, पो.उप.नि आकाश पवार,  पो.हवा.महेश धुमाळ, सुनील कुदळे, पंकज चंदिले, पो.ना. राकेश मोकल, पो.शि. आकाश भगत, भीमराव खताळ, यांनी खालील नमूद ०६ आरोपी यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली आहे.

१) राजू आप्पा पुकळे, वय-२५ वर्षे, व्यवसाय-नोकरी, रा. कलंबोली, नवी मुंबई, मु.रा. कामत, आटपाडी, जि. सांगली.

२) प्रमोद श्रीमंत कोकरे, वय-२८ वर्षे, रा.कोपरखैराणे, नवी मुंबई.

३) मायाप्पा किसन वळकुंदे, वय-२४ वर्षे, व्यवसाय-नोकरी, रा.कलंबोली, नवी मुंबई. मु.रा. कामत, आटपाडी, जि. सांगली.

४) किरण महावीर सरगर, वय-२८ वर्षे, व्यवसाय-T& T, रा. कामोठे, नवी मुंबई.

५) अशोक तानाजी पाटील, वय-२३ वर्षे, व्यवसाय - माथाडी, रा. कळंबोली, नवी मुंबई. मु.रा. कामत, आटपाडी, जि. सांगली.

६) संदीप लवाजी कोकरे, वय-२३ वर्षे, व्यवसाय - माथाडी, रा. कुर्ला, मुंबई. मु.रा. कामत, आटपाडी, जि. सांगली.

प्रस्तुत गुन्हा वर नमूद पोलीस पथकानी 24 तासाच्या आत उघडकीस आणून सर्व ०६ आरोपीताना अटक करून गुन्ह्यातील जबरीने चोरी केलेली सर्व मालमत्ता जप्त केलेली आहे आरोपीतास आज रोजी पोलीस कोठडी मिळणे कामी मा.न्यायालया समक्ष हजर करत आहोत.गुन्हयाचा पुढील तपास सपोनि संजय गळवे करीत आहेत.....


     टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या