💥तंत्रज्ञान समृद्ध युगात विद्यार्थ्यांमध्ये संशोधन व जिज्ञासा वृत्ती निर्माण होणे क्रमप्राप्त - उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार


💥येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात आयोजित विज्ञान प्रयोगशाळा उद्घाटन समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या💥

सेलू (दि.29 जानेवारी) - सध्याच्या या धकाधकीच्या व तंत्रज्ञान समृद्ध युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांमध्ये संशोधन व जिज्ञासा वृत्ती निर्माण होणे क्रमप्राप्त आहे असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार यांनी केले.येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात आयोजित विज्ञान प्रयोगशाळा उद्घाटन समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.

या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिरूद्ध जोशी,प्रमुख अतिथी प्रकीर्ण भुपेंद्र राणा,सचिव महेश खारकर,कोषाध्यक्ष ललित बिनायके,सदस्य जयंत दिग्रसकर,अभय सुभेदार, डॉ प्रवीण जोग, प्रवीण माणकेश्वर,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष नावकर आदींची उपस्थिती होती पुढे बोलताना त्यांनी विज्ञान व व्यावहारिक जीवनाचा ताळमेळ साधत सोदाहरण विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले.

लार्सन अॅन्ड टुब्रो चे शिक्षण संयोजक प्रकीर्ण राणा यांनी स्वयंप्रेरणेतून ही प्रयोगशाळा स्वखर्चाने उभारून दिली त्याबद्दल त्यांनी राणा यांचे कौतुक केले.प्रकिर्ण राणा यांनी श्री केशवराज बाबासाहेब विद्यालायला प्रकिर्ण राणा यांनी दिलेल्या विज्ञान प्रयोगशाळा ही अत्यंत अत्याधुनिक आहे.यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.यावेळी राणा यांचा शाल,श्रीफळ,सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड.अनिरूद्ध जोशी यांनी देखील राणा यांचे आभार मानले व पुढील काळात संस्थेचा विकास हाच सर्वतोपरी असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव महेश खारकर यांनी केले.सूत्रसंचालन जयश्री सोन्नेकर तर आभार मंगेश कुलकर्णी यांनी केले.कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित नागरिक,विविध शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या