💥परभणी जिल्ह्याचे नाव अवकाश संशोधनात उज्ज्वल करा - जिल्हाधिकारी आंचल गोयल


💥शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनँशनल फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात त्या म्हणाल्या💥 


परभणी (दि.२२ जानेवारी) : भारतीय अंतराळ संशोधन मोहिमेमध्ये आतापर्यंत मोठ्या शहरांची मक्तेदारी होती. ती या कार्यशाळेच्या माध्यमातून मोडीत निघणार असून, परभणीला ही संधी मिळाली आहे. त्या संधीचे सोने करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले. 


शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनँशनल फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात श्रीमती गोयल बोलत होत्या मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम फाऊंडेशनचे राष्ट्रीय समन्वयक एम. सुरेश, राज्य समन्वयक मनिषा चौधरी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ,(सा.प्र.) ओमप्रकाश यादव, संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर शिक्षणाधिकारी (प्रा.) विठ्ठल भुसारे, प्राचार्य बाळासाहेब जाधव, जिल्हा समन्वयक राजकुमार भांबरे, मेघश्याम पत्की, श्री. कुलथे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.


राज्यातील नागपूर, पुणे आणि परभणी येथे ही कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली असून, देशाला भविष्यात लागणारे शास्त्रज्ञ अशा प्रकारच्या कार्यशाळांमधून मिळतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला तामिळनाडूतील पट्टीपुरम येथून एकाचवेळी १५० उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार असून, यात परभणीच्या १५ उपग्रहांचा  समावेश राहणार आहे, ही परभणीकरांसाठी आनंददायी बाब आहे. मार्टीन ग्रूपचे स्वयंसेवक पदाधिकारी, संचालक, जिल्हा परिषद आणि मनपाच्या सहयोगाने ही कार्यशाळा आयोजित करण्याचा परभणीला मान मिळाला. या कार्यशाळेत आज बाल वैज्ञानिक सहभागी झाले आहेत. त्यांच्यामुळे देशासाठी आणि जिल्ह्यासाठी सुवर्णसंधी आहे त्या संधीचे सोने करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले. 

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी अंतराळवीर कल्पना चावला  आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्याबद्दलच्या आठवणी जागविल्या‌ भविष्यात माहिती तंत्रज्ञानावर आधारित आणि अवकाश संशोधनावरच काम सुरु राहणार आहे. परभणी आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये एका नववीच्या मुलाची मदत होत असल्याचा आवर्जून उल्लेख केला. या सर्व मुलांचा राष्ट्रीय कार्यात उपयोग होणार आहे. मार्टीन ग्रूपने चांगली संधी उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले.१९ फेब्रुवारी २०२३* रोजी लॉन्च करण्यात येणा-या मोहिमेत विद्यार्थ्यांनी बनविलेल्या १५ सँटेलाईटचा समावेश राहणार आहे. मॉर्टीन ग्रूपच्या सहाय्याने हे काम करण्यात येत आहे. या मोहिमेत सहभागी विद्यार्थ्यांना मार्टीन ग्रूपकडून आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. परभणीतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे डॉ. पाथ्रीकर यांनी सांगितले पुढील अवकाश संशोधन मोहिमेत परभणी हे मुख्य केंद्र असेल, असे सांगून मागील अवकाशात उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम यशस्वी झाली होती, असे  मोहीमेचे राष्ट्रीय समन्वयक एम. सुरेश यांनी सांगितले.

भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हाऊस ऑफ कलाम, स्पेस झोन इंडिया, मार्टीन ग्रुप यांच्या वतीने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हीकल मिशन २०२३ आयोजित केले आहे. या मोहिमेतील उपग्रह प्रक्षेपित केल्यानंतर पराशुटच्या मदतीने परत जमिनीवर उतरणार आहेत. या मोहिमेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यास पिको उपग्रह आणि रॉकेट बनविण्यासंबंधित १० दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते. या कार्यशाळेत सहभागी झालेले १०० विद्यार्थी चेन्नई येथे जाऊन प्रत्यक्ष रॉकेट बनवतील. डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन रामेश्वरम् तामिळनाडू या संस्थेमार्फत हा उपक्रम देशात राबवला जात आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी यादव हीने केले. प्रास्ताविक राजकुमार भाबंरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. आनंद पाथ्रीकर यांनी केले. या मोहिमेत २०२१ मध्ये सहभागी झालेल्या युवराज भांबरे, कल्पेश पत्की, अनन्या कुलथे आणि आदित्य चौधरी या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या