💥हिंदू राष्ट्र नव्हे तर संविधान राष्ट्र : ऑल इंडिया पँथर सेनेच्या राज्य मेळाव्यात संविधान बचाव,धर्मसत्ता हटावचा नारा.....!


💥सर्व निवडणुका लढविण्याचा निर्णय💥

अहमदनगर (प्रतिनिधी)- निवडणुकांसाठी राम मंदिरचा मुद्दा संपल्याने, आता लव्ह जिहादचा मुद्दा जन्माला घालण्यात आला आहे. भारत हा हिंदू राष्ट्र नव्हे, तर संविधान राष्ट्र आहे. मागासवर्गीयांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात बंड करण्यासाठी व राजकारणातील जातियवादींचे चेहरे उघडे पाडण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचा एल्गार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी केले. तर संविधान बचाव धर्मसत्ता हटावचा नारा देऊन, सर्व निवडणुका लढविण्याचा निर्णय या मेळाव्यातून घेण्यात आला.


पुढे केदार म्हणाले, अहमदनगर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. या भूमीतूनच राजकीय पर्वाची भूमिका जाहीर केली आहे. समाज रक्षणाचा पँथरचा हा लढा असून, गुलामगिरी नष्ट करण्यासाठी हा संघर्ष आहे. मागासवर्गीय समाजावर सर्वात जास्त अत्याचार नगर जिल्ह्यात होत आहे. या अत्याचाराचा बिमोड करण्यासाठी पँथर एकवटले आहे. दंगलीतून नव्हे, तर समतेतून सत्ता मिळवून समाज घडविण्याचे कार्य पँथर सेना करणार आहे. स्वाभिमानाची ही चळवळ असून, गुलामगिरी झुगारणारी असल्याचे त्यांनी सांगितले.अहमदनगरचे नाव बदलण्याऐवजी पहिले गुजरातमधील अहमदाबादचे नाव बदलावे.

संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा धीरेंद्र बाणेश्‍वरचा निषेध

ऑल इंडिया पँथर सेना येणार्‍या सर्व निवडणुका लढविणार आहे. बौद्ध, आदिवासी, मुस्लिम, शोषित घटकांच्या सामाजिक स्वातंत्र्यासाठी राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी पँथर सेना मैदानात उतरली आहे. आठ वर्षात उभे राहिलेल्या हुकूमशाही धर्मसत्तेविरोधात देशभर निळा झेंडा हातात घेऊन, आंबेडकरवादी चळवळीने मानवता, बंधुत्व, समानता, न्याय, संविधान टिकवण्यासाठी हा लढा राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोदी प्रणीत भाजप सरकारची अराजकतेची व्यवस्था उघडून फेकण्याची ताकद फक्त आंबेडकरवादी शक्तीमध्ये आहे. ही चळवळ राजकीय रित्या गतिमान करण्यासाठी निळा शक्ती व निळा झेंडा घेऊन रणशिंग फुंकण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात दलित अत्याचाराने थैमान घातले आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त दलितांवर अत्याचार झालेला आहे. हा जिल्हा अत्याचारग्रस्त घोषित करावा व दलितांना संरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्याची मागणी देखील त्यांनी केली. तर या मागणीसाठी देखील लढा देणार असल्याचे सांगितले. आंबेडकरी समूहाचे मुद्दे कोणाच्याही पटलावर नाहीत. गायरान जमीन, घरकुल, शिक्षण, शिष्यवृत्ती, नोकरीतील अनुशेष, दलित अत्याचार, आर्थिक नाकेबंदी, सामाजिक गुलामगिरी आजही जातीमुळे असतित्वात आहे. या समाजाला फक्त निवडणुकीत सन्मान दिला जातो. यासाठी राजकीय सत्तेमध्ये जाणे गरजेचे आहे. समाजाच्या कल्याणासाठी व शोषणमुक्तीसाठी निवडणुकीतून निळी शक्तीची ताकद दाखविणार असल्याचेही ते म्हंटले. युतीवर बोलताना त्यांनी भीक न मागता सन्मानाने बोलावल्यास युती केली जाणार असल्याचेही स्पष्ट केले.

अहमदनगरचे नामांतर होऊ देणार नाही. आमचा नामांतराला विरोध आहे. अहमदनगरला मुस्लिम विरोधी नजरेतून बघू नका. गोपीचंद पडळकर यांना पुढे करुन नामांतर हा आरएसएसचा मुद्दा आहे. धनगर समाजाची भटकंती थांबविण्यासाठी त्यांना आर्थिक, सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी पडळकर यांनी भाजपच्या सत्तेचा वापर करावा. राजकारणासाठी माता अहिल्याबाई होळकरांचा वापर करू नये. अहमदनगरची स्थापना अहमदशहाने केली आहे. शहराचे नाव अहमद आहे म्हणून विरोध होत असेल तर, पहिले गुजरातमधील अहमदाबादचे नाव बदलावे. तसेच मध्यप्रदेशातील इंदूरला अहिल्याबाई होळकरांचे नाव द्यावे व इंदूरचा राजवाड्यास राष्ट्रीय स्मारक घोषित करुन भव्य स्वरुपात अहिल्याबाई यांच्या मुर्तीची उभारणी करण्याची मागणी देखील केदार यांनी केली. तर शहरांच्या नामांतराचे भांडणे लावायचे आणि महाराष्ट्रात आलेले उद्योग कंपन्या इतर ठिकणी पळवायच्या हे भाजपचे कारस्थान असल्याच आरोप त्यांनी केला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या