💥जेष्ठ पत्रकार मदन (बापू) कोल्हे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त गरजु महिलांना साडी वाटप....!


💥पत्रकार मदन (बापू) कोल्हे यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस विविध समाजातील महिलांना साडी वाटप करुन साजरा💥

परभणी (दि.२४ जानेवारी) - सामाजिक व पत्रकारीता क्षेत्रात गेल्या ५२ वर्षांपासून अखंड कार्यरत असणारे येथील जेष्ठ पत्रकार मदन ( बापू) कोल्हे यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस विविध समाजातील गरजू महिलांना साडी वाटप करुन साजरा करण्यात आला.

  गत पाच दशकापासून विविध समाजातील लोकहिताचे कार्यामुळे नावलौकिक प्राप्त झाले ले व सर्व समाजात लोकप्रिय असलेले मदन(बापू) कोल्हे यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस त्यांच्या पत्रकार व मित्र परिवारातर्फे दि.१७ जानेवारी २०२३ रोजी उत्सुर्फपणे साजरा करण्यात आला.सर्वप्रथम सकाळी खंडोबा बाजारातील त्यांच्या ' धर्मभूमी ' या निवासस्थानी , वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजक, इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन चे परभणी जिल्हा मिडिया चिफ तथा सा.वैभवज्वाला चे संपादक देवानंद शंकरराव वाकळे, मा.मुख्याध्यापक दत्ता तुरनर,सा.हर्ष नगरी चे संपादक संघपाल अढागळे,सा.जय नरहरी चे संपादक शरद कुलथे, नांदेड चे सामाजिक कार्यकर्ते गंगाधर सावळे, सारीपुत्र वाकळे यांनी शाल व पुष्पहार घालून सत्कार केला. 'इरा ' चे सेनगाव तालुका अध्यक्ष दत्ता तुरनर यांनी ' संविधान ' प्रत देऊन सत्कार केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

  तर दुपारी वाशिम चे प्रसिद्ध उद्योगपती मा.गिरधारीलाल रामेश्वरजी सारडा यांनी स्वतः 'धर्मभुमी ' निवासस्थानी येवून या ठिकाणी थांबलेल्या खंडोबा बाजार, शांतीदूत नगर, संत कबीर नगर,वांगी रोड मधील, विविध समाजातील गरजूवंत महिलांना, मदन बापू यांच्या वाढदिवसानिमित्त स्वहस्ते साड्यांचे वाटप केले.यावेळी मदन बापूंच्या वयोवृध्द मातोश्री श्रीमती वत्सलाबाई कोल्हे यांची मा.गिरधारीलाल सारडा जी यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली व दर्शन घेऊन त्यांचा ही त्यांनी यथोचित सन्मान केला.या वेळी त्यांचे सोबत वाशिम चे सामाजिक कार्यकर्ते आकाश देशमुख , पत्रकार देवानंद वाकळे,नांदेड चे सामाजिक व पत्रकारीता क्षेत्रातील कार्यकर्ते जी.सावळे , सारीपुत्र वाकळे ,सौ.आशा कोल्हे,सौ.मनिषा शशीकांत एंगडे  व या भागातील नागरिक उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या