💥वाशिम जिल्ह्यामध्ये अवैध जुगार धंद्यावर धडक कारवाईत २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त.....!


💥जिल्ह्यात अवैध जुगारांस पायबंध घालून समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यात पोलिस दलाची विशेष मोहीम💥

(फुलचंद भगत)

वाशीम :- समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी त्याचबरोबर अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे सतत कारवाया सुरु असतात. त्याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात अवैध जुगारांस पायबंध घालून समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली.

त्या अनुषंगाने दि.२५.०१.२३ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कारंजा यांच्या पथकाने पो.ठाणे कारंजा शहर हद्दीतील १) राज पॅलेस नगीना मशिद जवळ कारंजा २) जुना सरकारी दवाखाना ३) राधाकृष्ण हॉटेलचे मागील बाजू ४) जयस्तंभ चौक कारंजा ५) गांधी चौक कारंजा येथे अवैध जुगार धंद्यावर छापा टाकून नगदी २९६७६/- रु., एकूण २२ मोबाईल किं.अं.८२९००/-, ०४ दुचाकी वाहने किं.अं.१,१५,०००/- असा एकूण २,२७,५७६/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. १) राज पॅलेस येथील छापा कारवाईमध्ये जुगार खेळणाऱ्या एकूण ३४ आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्ह्यातील उर्वरित ०२ आरोपी फरार आहेत. २) जुना सरकारी दवाखाना येथे ०१ आरोपी, ३) राधाकृष्ण हॉटल मागील गल्ली ०५ आरोपी, ४) जयस्तंभ चौक ०२ आरोपी ५) गांधी चौक ०२ आरोपी असे एकूण ४६ आरोपींवर पो.स्टे.कारंजा शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.जगदीश पांडे यांच्यासह पोउपनि बि. सी. रेघीवाले नेम.पो. ठाणे कारंजा शहर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कारंजा येथील सफो. / ६७ मुरलिधर बुले, पोहवा / १६५ विनायक देवधर,पोहवा/५९५ अनंता इंगोले, पोहवा / ९१८ नंदकिशोर बचे, पोहवा / ९४५ अमित वानखडे, चापोशि/१०१२ शरद सोनीकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मंगरूळपीर येथील सफौ/५४९ माणिक चव्हाण, पोशि/ ०५ रामेश्वर राऊत, मपोशि/१२४९ विद्या राऊत, पोशि/१४५९ लक्ष्मण राऊत, पोशि/ ८८ मंगेश गादेकर, पोशि/ ३५१ इस्माईल कालीवाले या अंमलदारांचे पथकाने पार पाडली. श्री. बच्चन सिंह (IPS) पोलीस अधीक्षक, वाशिम यांनी सर्व जनतेस सुजाण नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी त्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल,असे आवाहन केले आहे......


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या