💥परभणीत पक्षाध्यक्ष तथा आ.बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाची आढावा बैठक संपन्न.....!


💥प्रहार जनशक्ती पक्ष प्रत्येक निवडणुकीमध्ये पूर्ण ताकतीनिशी उतरणार - आ.बच्चुभाऊ कडू 

परभणी (दि.२६ जानेवारी) - प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आ. बच्चुभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत काल दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी परभणी शहरातील अरोमा हॉटेल येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न झाली.


शिक्षक मतदार संघाचे प्रहार जनशक्ती पक्ष व मेस्टा संघटनेचे अधिकृत उमेदवार श्री संजय विठ्ठलराव तायडे यांच्या प्रचारासाठी आमदार बच्चुभाऊ कडू हे परभणी येथे आले होते. या प्रचार दौऱ्यादरम्यान आज त्यांनी प्रहार जनशक्ती पक्ष, महिला आघाडी सह प्रहारच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व प्रहार जनशक्ती पक्ष प्रणित प्रहार शिक्षक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. बच्चुभाऊ कडू म्हणाले की प्रहार जनशक्ती पक्ष हा एक राजकीय पक्ष असून छोट्या असो वा मोठ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष पूर्ण ताकतीनिशी उतरणार आहे. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात देखील प्रहार जनशक्ती पक्षाने संजय तायडे यांच्या रूपाने आपला उमेदवार दिला असून मराठवाड्यामध्ये असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या ताकतीवर व कार्यकर्त्यांच्या परिश्रमांवर ही निवडणूक आपण सहज जिंकू असा विश्वास आ. बच्चुभाऊ कडू यांनी यावेळी व्यक्त केला.

💥प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी देखील या बैठकीला मार्गदर्शन केले :-

या बैठकीत प्रहार चे उपजिल्हाप्रमुख नरेश जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पूर्णा तालुक्यातील गौर ग्रामपंचायत निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या विजयी झालेल्या चार ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार तसेच उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या परभणी तालुक्यातील पाथरा ग्रामपंचायत निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या निवडून आलेल्या दोन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आ. बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते करण्यात आला तसेच राष्ट्रवादी अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद अल्ताफ व  पाथरा येथील माजी सरपंच असलम शेख आपल्या कार्यकर्त्यासह आ. बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.

बैठकीला प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, महिला आघाडी जिल्हाप्रमुख माधवीताई घोडके पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश जोगदंड, उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, पूर्णा शहर प्रमुख संजय वाघमारे, प्रहार अपंग संघटनेचे देवलिंग देवडे, दीपक खुडे, शेतकरी आघाडी तालुकाप्रमुख सय्यद मुस्तफा, शहर चिटणीस वैभव संघई, उद्धव गरुड, महिला आघाडी शहर चिटणीस एड. सुवर्णाताई देशमुख, उपशहर प्रमुख सुषमाताई देशपांडे, गोपाळ लाड, सय्यद युनूस, शेख बशीर, सूर्यकांत आगलावे, सय्यद नाजेर, सय्यद आरमान, शिवाजी जाधव, कैलाश राष्ट्रकूट, ज्ञानेश्वर पंढरकर, अंकुश गिरी, पिंटू कदम, बालाजी मगर, रामेश्वर पुरी, नारायण ढगे, सतीश नखाते, ओंकार गव्हाणे, शंकर दामोदर, खटिंग यांच्या सह प्रहरचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या