💥जिंतूर नगर परिषदेच्या अनागोंदी कारभाराबाबत माजी नगरसेवकांनी दिला अमरण उपोषणाचा इशारा.....!


💥जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात चौकशीची केली मागणी💥

जिंतूर प्रतिनीधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांची मनमाणी करून गैरव्यवहार, अपहार व बेकायदा कामांचा कळस गाठला असून या विरोधात नगरपरिषद चे माजी नगरसेवक एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात चौकशी करण्यात यावी नसता आमरण उपोषणांचा इशाराही देण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की जिंतूर नगरपरिषद च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनमानी करून मोठ्या प्रमाणात गौरवहार केला असून त्यांची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी व आमच्या जनहितार्थ मागण्या मान्य करण्यात याव्या असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की नागोरोत्थान योजनेअंतर्गत रखडलेली पाणीपुरवठा योजनेची कामे, प्रशासक काळामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करणे ,अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 11 लाख 3 हजार रुपयांचा अपहरणाची चौकशी करणे, वाहनातील डिझेल वापरांची चौकशी करणे, न. प.तील संमती पत्र वारसा हक्कांचे होणारे प्रकरण मार्गी लावणे, व सर्वे नंबर 122/1 , 122/2, 122/3  व 123/1, 123/2  मधील 13.49 जमिनीची बेकायदेशीर लेआउट विक्री प्रकरणी चौकशी करणे व संबंधितावर कारवाई करणे, घरपट्टी नळपट्टीवरील थकीत करारावर 2℅ टक्के व्याज दर रद्द करणे, मालमत्ता करावरील अतिरिक्त स्वच्छता कर 360 रुपये रद्द करणे, जिंतूर शहरातील 40% पदाधिवे बंद असून संबंधित दुरुस्ती करणाऱ्या संस्थेची चौकशी करणे व नवीन पाणीपुरवठा योजना कार्यन्वीत नसताना करण्यात आलेली पाणीपुरवठा  कर रद्द करावा, आदी अनेक मागण्या निवेदनात देण्यात आल्या असून त्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणांचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे सदरील निवेदनांच्या प्रति माननीय उपविभागीय अधिकारी सेलू, उपविभागीय पोलीस अधिकारी जिंतूर, तहसीलदार जिंतूर ,पोलीस स्टेशन जिंतूर, व मुख्याधिकारी जिंतूर यांना देण्यात आल्याचे म्हटले आहे.

या निवेदनावर माजी नगरसेवक उस्मान का पठाण, मिर्झा शाहेदबेग, चंद्रकांत बहीरट, शेख सोहेब शे.तहजीब, शेख इस्माईल शेख सलीम, दलबीर का पठाण, मनोहर डोईफोडे, दत्ता काळे, इस्माईल शेख, बंटी निकाळजे, शेख अहमद स. रज्जाक आदि माजी नगरसेवकांच्या स्वाक्षरी आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या